
प्रेक्षक ‘किंगडम’बद्दल प्रचंड प्रेम दाखवत आहेत. अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाल्यानंतर, अवघ्या 24 तासांत 30 हजार तिकिटे बुक झाली आहेत. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगली आहे.

चित्रपटगृहाबाहेर मोठे कटआऊट लावण्यात आले आहेत. तब्बल 75 फुट उंच कटआऊट लावण्यात आले आहेत.

किंग्डमचा ट्रेलर 26 जुलै रोजी प्रदर्शित झाला होता, ज्याला चाहत्यांकडून प्रचंड प्रेम मिळाले आहे. आता, ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांनी, हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होत आहे. हा सिनेमा 31 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

द कास्ट ऑफ किंग्डम ‘किंग्डम’चे दिग्दर्शन गौतम तिन्ननुरी यांनी केले आहे. त्याचे निर्माते सूर्यदेवर नागा वंशी आणि साई सौजन्य आहेत.

सिनेमात विजय सुरी नावाच्या गुप्तहेराची भूमिका साकारत आहे. त्याच्यासोबत भाग्यश्री बोरसे आणि सत्यदेव कंचराणा सारखे कलाकार देखील चित्रपटात दिसणार आहेत.