प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याकडून महिलेचं शोषण? आरोपांवर स्पष्ट म्हणाला ‘जळणारे लोक..’

"माझा नवीन चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करतोय. कदाचित माझ्यावर जळणारे लोक विचार करत असतील की माझी बदनामी करून ते माझ्या चित्रपटाचं नुकसान करू शकतील. परंतु असं होणार नाही", असा विश्वास त्याने व्यक्त केला.

| Updated on: Jul 31, 2025 | 3:29 PM
1 / 6
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपतीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. रम्या मोहन नावाच्या एका युजरने एक्स अकाऊंटवर त्याच्याविरोधात ट्विट केलं होतं. विजयने इंडस्ट्रीत विषारी कल्चरला प्रमोट केलंय, तो ड्रग्ज, कास्टिंग काऊच आणि लैंगिक शोषणाशी संबंधित असल्याचा आरोप तिने केला होता.

2 / 6
या पोस्टनंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली होती. विजयचा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत खूप मोठा चाहतावर्ग आहे. चाहत्यांनी संबंधित युजरला ट्रोल केल्यानंतर तिने ती पोस्ट डिलिट केली. आता या आरोपांवर विजयने प्रतिक्रिया दिली आहे.

3 / 6
'डेक्कन क्रॉनिकल'ला दिलेल्या मुलाखतीत विजयने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. या आरोपांवर कुटुंबीय खूप नाराज असल्याचं त्याने म्हटलंय. पण त्याचसोबत अशा गोष्टींमुळे काही फरक पडत नसल्याचंही त्याने स्पष्ट केलंय.

4 / 6
"जे लोक मला थोडंफार ओळखतात, ते अशा गोष्टी ऐकून हसतील. मीसुद्धा स्वत:ला ओळखतो. अशा प्रकारच्या तथ्यहीन आरोपांचा माझ्यावर काहीच परिणाम होऊ शकत नाही", असं तो म्हणाला.

5 / 6
याविषयी त्याने पुढे सांगितलं, "माझे कुटुंबीय आणि मित्रपरिवार थोडा निराश आहे. मी त्यांन समजावलं की, जाऊ द्या. कदाचित लक्ष वेधून घेण्यासाठी संबंधित महिलेनं अशी पोस्ट लिहिली असावी. तिला काही मिनिटांची प्रसिद्धी मिळाली आहे. त्याचा तिला आनंद घेऊ द्या."

6 / 6
याविरोधात विजयने सायबर क्राइममध्ये तक्रार दाखल केली आहे. गेल्या सात वर्षांत अनेक अफवांचा सामना करावा लागत असल्याचं विजयने सांगितलं. त्यामुळे आता अशा गोष्टींमुळे काहीच फरक पडत नसल्याचं त्याने स्पष्ट केलं.