
विक्रोळी रेल्वे स्थानकालगत असलेल्या झोपडपट्टीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

येथे एका घरात महिलेचा गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. सुमन सूरज निर्मल असे या मृत महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मृत महिलेचा पती हा सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहे. आज पहाटे जेव्हा तो घरी परतला तेव्हा त्याला घरात पत्नीचा मृतदेह सापडला.

तिचा गळा चिरलेला होता. तसेच तिचे हातही बांधलेल्या स्थितीमध्ये होते. त्यानंतर लगेच या घटनेची माहिती त्याने पोलिसांनी दिली.

त्यानंतर विक्रोळी पोलीस, फॉरेन्सिक टीम, डॉग स्कॉड , क्राईम ब्रांच दाखल झाले होते. ही हत्या करणाऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेमुळे विक्रोळीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.