पाणी टंचाईने हिंगोलीत गावकरी त्रस्त, पाण्यासाठी कित्येक मैलांची भटकंती..

मराठवाडा येथील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात प्रसिद्ध तीर्थस्थळ असूनही या तालुक्यातील संघनाईक तांडा गावाला मात्र सध्या भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

| Updated on: May 08, 2026 | 6:21 PM
1 / 5
औंढा नागनाथ तालुक्यातील संघनाईक तांडा गावातील ग्रामस्थांना कळशा- हंडे घेऊन  राना- वणातून पायपीट  करावी लागत आहे. गावातील तळ गाठलेल्या विहिरींचे पाणी शेंदावे लागत आहे. गावातील लोक टँकरची मागणी करूनही प्रशासन टँकर देत नाही अशी गाऱ्हाणी गावातील रहिवासी करीत आहेत.

2 / 5
 पाण्यासाठी ग्रामस्थांना दिवसभर उन्हा ताणात  फिरावे लागत आहे.घरात  सात ते आठ माणसे असल्याने चार घागरी पाणी पुरते का?असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत.चार महिने आम्ही ऊस तोडणीसाठी जातो,तिकडून आले की आम्हाला पाणीच भराव लागते. आठ दिवस झाले तरी अजून टँकर आलेला नाही अशी कैफीयत गावकरी करीत आहेत.

3 / 5
 पाणी नसल्याने लेकरांचे शिक्षण होत नाही. ऊन मरणाचं लागत आहे. आम्हाला प्यायला देखील पाणी नाही. आम्ही काय करावे ? टँकरची मागणी केली तरी आज उद्या म्हणत दिवस काढत आहेत. काल आम्ही दिवसभर उन्हात टँकरची वाट पाहत बसलो होतो. पण टँकर काय आला नाही. मग आता आम्ही काय करावे असा सवाल गावकरी करत आहेत.

4 / 5
 गावातील वयोवृद्ध आणि चिमुकल्या लहान मुलांना हातात घागरी घेऊन  गावाच्याबाहेर असलेल्या विहिरीचे पाणी आणण्यासाठी जावे लागत आहेत.आमची मुले नोकरी निमित्त पुण्याला आहेत. आता या वयात आम्हाला पाणी शेंदण होत नाही.मला 60 वर्षे झाली तरी सारी जिंदगी या पाण्यासाठी अशीच चालली आहे. आम्ही दुसरे काही मागत नाही, केवळ पाणी मागत आहोत अशी मागणी गावातील महिलेने केली आहे.

5 / 5
पाणी वाचवण्यासाठी लहान मुलांना  खाटेवर (बाजेवर )बसवून अंघोळ घालावी लागत आहे. खाटेखाली पडणारे अंघोळीचे सांडपाणी टोपल्यात जमा करून इतर कामासाठी वापरत असल्याची प्रतिक्रिया महिलांना दिली आहे. टीव्ही 9 मराठीचे रमेश चेंडके यांनी या गावकऱ्यांशी संवाद साधून या प्रश्नाला वाचा फोडली आहे.

Follow Us