AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हॉटेलच्या रुममधील भिंतींवर घड्याळ का नसते ? या मागील खरे कारण जाणून दंग व्हाल

तुम्ही कधी नोटिस केले आहे का बहुतांशी लक्झरी हॉटेलच्या भिंतींवर घड्याळ नसते. या मागे केवळ डिझाईन कारण नसते तर या मागे एक खास मनोवैज्ञानिक आणि बिझनस स्ट्रेटेजी लपलेली असते. चला तर पाहूयात हॉटेलच्या रुममध्ये घड्याळ का नसते ?

हॉटेलच्या रुममधील भिंतींवर घड्याळ का नसते ? या मागील खरे कारण जाणून दंग व्हाल
HOTEL ROOM
| Updated on: May 08, 2026 | 8:25 PM
Share

तुम्ही घरात, कार्यालयात, ऑफीसमध्ये भिंतीवर घड्याळ टांगलेले पाहिले असेल. मात्र, कोणत्याही हॉटेलच्या रुममध्ये कधी घड्याळ शो पिस म्हणूनही लावलेले नसते.जेव्हा कधी रुम चांगल्या हॉटेलात राहण्यासाठी उतरता, तेव्हा रुममध्ये नेहमीच महागडे पडदे, स्वच्छ बेडशीट्स, सुंदर लाईट्स आणि शानदार नजारा असतो. मात्र, त्या आलिशान रुममध्ये घड्याळ मात्र नसते. अनेकांना ही सामान्य गोष्ट वाटत असेल मात्र, याचे कारण जाणून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल…

ही गोष्ट सर्वांना माहिती आहे की हॉटेल केवळ राहण्याचा जागा नसते. तर तेथे लोक आपल्या व्यस्त शेड्यूल पासून काही घटना आराम आणि निवांत क्षण घालवण्यासाठी आलेले असतात. त्यामुळे आपल्या पाहुण्याने जगाच्या घाईगडबडीपासून निवांत आराम करावा असे हॉटेल वाल्यांना वाटत असते. त्याने येथे सर्व चिंतांपासून मुक्त होऊन निवांत राहावे असे त्यांना वाटत असते.

हॉटेलमध्ये घड्याळ नसल्याचे खरे कारण

हॉटेल इंडस्ट्रीचे मानणे आहे की जर रुममध्ये समोर घड्याळ लावले तर लोक वारंवार घड्याळात वेळ पाहात राहातील. त्यामुळे त्यांच्या डोक्यात लवकर उठणे, मीटींग, चेकआऊट वा पुढील कामाची चिंता लागून राहिल.याच कारणने अनेक हॉटेलमध्ये जाणून बुजून घड्याळ नाही ठेवत नाहीत. आपले पाहुणे जास्त रिलॅक्स व्हावेत त्यांनी स्टे मोकळेपणे एन्जॉय करावे असे त्यांना वाटत असते.

स्ट्रेस फ्री बनवण्याची एक ट्रिक

हॉटेलच्या रुमचा माहोल अशा प्रकारे डिझाईन केला जातो की तेथे पोहचताच लोकांनी आराम करावा. रुममधील हलकी लायटिंग, चांगला स्वच्छ बेड, सुंगधित वातावरण आणि शांत म्युझिक सर्व मेंदूला रिलॅक्स करण्यासाठी असते. जर रुममध्ये सतत टीक..टीक करणारे घड्याळ लावले तर आरामाची जाणीव कमी होईल. त्यामुळे मोठे हॉटेल्स टाईम लेस म्हणजे वेळेपासून दूर आरामाचा अनुभव देण्याचा प्रयत्न करतात.

हॉटलची स्मार्ट बिझनस स्ट्रॅटेजी

असे बिलकुल नाही की केवळ पाहुण्यांचा आराम पाहून हॉटेलवाले घड्याळ लावत नाहीत. तर या मागे एक स्मार्ट बिझनस स्ट्रॅटेजी देखील असते. जेव्हा लोकांना वेळेचा जास्त जाणीव होत नाही तेव्हा ते हॉटेलच्या सुविधांचा जास्त वेळ वापर करतील.

खालील फायदे असतात…

लोक जास्त वेळ हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये राहातील

स्पा आणि स्विमिंग पूलमध्ये जास्त वेळ घालवतील

कॅफे आणि लाऊंजमध्ये आरामात वेळ घालवतील

रुममध्ये जास्त वेळ क्वालिटी टाईम स्पेंड करतील

यामुळे हॉटलेची कमाई देखील वाढते आणि त्यामुळे ही एक प्रकारची स्मार्ट मार्केटिंग ट्रिक देखील आहे. त्यामुळे अनेक लोक वेळेवर तयार होऊ शकत नाहीत आणि चेक आऊटच्या वेळी अनेकदा त्यांच्या तासांच्या हिशेबाने एक्स्ट्रा चार्ज देखील भरावा लागतो.

प्रत्येक हॉटेलात नसते घड्याळ ?

प्रत्येक ठिकाणी हॉटेलात अशी स्ट्रेटजी नसते. बिझनस हॉटेल वा एअरपोर्ट हॉटेलात नेहमीच डिजिटल क्लॉक वा अलार्म घड्याळ असतात, कारण तेथे उतरणाऱ्या लोकांना वेळेचे भान राखणे गरजेचे असते. परंतू लक्झरी हॉटेल किंवा रिसॉर्टमधील भिंतीवर घड्याळ कमीच पाहायला मिळतात.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा