AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आनंदाने खा आणि प्या, पण जास्त गटार-बिटारात लोळू नका, भरत गोगावले यांच्या गटारीच्या अनोख्या शुभेच्छा

राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी गटारी अमावस्येनिमित्त अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. "आनंदाने खा आणि प्या... पण जास्त गटार-बिटारात लोळू नका," असा गमतीशीर सल्ला त्यांनी दिला. उद्यापासून श्रावण महिना सुरू होत असल्याने, तत्पूर्वी गटारीचा आनंद घेणाऱ्यांना त्यांच्या खास शैलीतील या शुभेच्छा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

आनंदाने खा आणि प्या, पण जास्त गटार-बिटारात लोळू नका, भरत गोगावले यांच्या गटारीच्या अनोख्या शुभेच्छा
bharat gogawaleImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 12, 2026 | 12:10 PM
Share

आनंदाने खा आणि प्या… पण जास्त गटार-बिटारात लोळू नका, अशा अनोख्या आणि हटक्या शुभेच्छा राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी दिल्या आहेत. उद्या 13 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत असल्याने तत्त्पूर्वीच गटारीनिमित्त मेजवानी करणाऱ्यांना मंत्री भरत गोगावले यांनी आपल्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. गोगावले यांनी या अनोख्या आणि हटके शुभेच्छा दिल्याने त्याची सोशल मीडियात चांगलीच चर्चा सुरू आहे.

12 तारखेला गटारी साजरी करताना नागरिकांनी आनंदाने खा आणि प्या, पण जास्त गटार-बिटारात लोळू नका,” असा गमतीशीर सल्ला भरत गोगावले यांनी दिला आहे. श्रावण महिना आणि त्यानंतर येणारा गणेशोत्सव लक्षात घेता पुढील एक महिना 15 दिवस पोटाला थोडा संयम आणि विश्रांती देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. अलिबाग येथील कार्यक्रमात बोलताना दिलेला हा अनोखा सल्ला आणि त्यांचा वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेहमी आपल्या गावरान आणि रोखठोक विधानांमुळे चर्चेत राहणाऱ्या भरत गोगावलेंच्या या वक्तव्याची नागरिकांमध्ये आणि नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

पावणे दोन वर्षानंतर तिढा सुटला

दरम्यान, गोगावले यांनी काल मीडियाशी संवाद साधताना रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर भाष्य केलं आहे. पावणे दोन वर्षापासून हा तिढा होता तो आज सुटलेला आहे. स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले आणि उद्या याचे डिक्लेरेशन होईल, असे आम्हाला वाटते, असं गोगावले म्हणाले.

आम्ही काम करणारी मंडळी आहोत. आमदार आहेत, खासदार आहेत. दोन मंत्री आहेत. आम्ही सगळे मिळून काम करू. जिल्ह्याचा विकास करू. ठीक आहे प्रत्येकाला असं वाटतं. परंतु परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो. त्यांच्या अनिकेत तटकरे यांना विधान परिषदेवर आम्ही बिनविरोध पाठवलं. त्यानंतर आम्ही बसून हे सगळं ठरवलं आणि त्यांनी ते मान्य केलं, असंही त्यांनी सांगितलं.

आज गटारी, उद्यापासून श्रावण

दरम्यान, आज गटारी अमावस्या आहे. उद्यापासून श्रावण सुरू होणार आहे. त्यामुळे उद्यापासून अनेक जण मांसाहार टाळतात. मद्यपान करणंही टाळतात. मात्र, आदल्या दिवशी असणाऱ्या गटारी अमावस्येचा भरपूर आनंद लुटत असतात. आजही तळीराम गटारी अमावस्येचा भरपूर आनंद लुटताना दिसत आहेत. अनेकांनी तर आधीच प्लान केल्या प्रमाणे पिकनिक स्पॉटही गाठून आनंदाला वाट मोकळी करून दिली आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?