AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठरलं! शनिवारी थलपती विजय घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, तामिळनाडूला मिळणार नवे मुख्यमंत्री

मोठी बातमी समोर येत आहे, अखेर तामिळनाडूमधील सत्ता पेच सुटला आहे. शनिवारी सकाळी 11 वाजता थलपती विजय हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांना राज्यपालांकडून सत्ता स्थापनेच निमंत्रण देण्यात आलं आहे.

ठरलं! शनिवारी थलपती विजय घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, तामिळनाडूला मिळणार नवे मुख्यमंत्री
thalapathy vijayImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 08, 2026 | 8:28 PM
Share

तामिळनाडूमधून मोठी बातमी समोर येत आहे, अखेर सत्ता स्थापनेचा पेच सुटला आहे. थलपती विजय हे उद्या 11 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तामिळनाडूचे राज्यपाल विश्वनाथ अर्लेकर यांनी विजय थलपती यांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे आता तामिळनाडूला उद्या नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. टीव्हीके तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापन करणार आहे. तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत यावेळी थलपती विजय यांच्या टीव्हीकेनं जोरदार मुसंडी मारल्याचं पहायला मिळालं. पक्षाला राज्यात सर्वाधिक 108 जागा मिळाल्या. मात्र सर्वाधिक जागा मिळून देखील आतापर्यंत थलपती विजय हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकले नाहीत, कारण त्यांच्याकडे बहुमत नव्हतं. तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 118 जागांची गरज आहे. मात्र टीव्हीकेला 108 च जागा मिळाल्या होत्या. त्यांना बहुमतासाठी आणखी 10 आमदारांचा पाठिंबा आवश्यक होता.

दरम्यान त्यानंतर थलपती विजय यांना काँग्रेसने पाठिंबा दिला, काँग्रेस आणि टीव्हीकेचे मिळून एकूण सदस्या संख्या 112 झाली मात्र तरी देखील टीव्हीकेला सत्ता स्थापनेसाठी आणखी 6 आमदारांची गरज होती. अखेर सीपीएम आणि सीपीए या डाव्या पक्षांनी थलपती विजय यांना पाठिंबा दिल्यानं टीव्हीकेकडे बहुमत झालं आहे. त्यानंतर आता राज्यपालांनी थलपती विजय यांना सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केलं आहे. थलपती विजय हे उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

त्यापूर्वी थलपती विजय यांनी राज्यपालांची दोनदा भेट घेतली होती, सत्तास्थापनेचा दावा केला होता, मात्र राज्यपालांनी त्यांना 118 आमदारांच्या पाठिंब्याची यादी सादर करण्यास सांगितलं होतं. शेवटी सीपीएम आणि सीपीए यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे आता थलपती विजय यांच्या पक्षाला बहुमत प्राप्त झालं आहे. त्यामुळे तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच सुटला आहे. थलपती विजय यांच्या पक्षाकडून एआयएडीएमकेकडे देखील पाठिंब्याची मागणी करण्यात आली होती. परंतु एआयएडीएमकेने थलपती विजय यांना पाठिंबा देण्यास नकार दिला. दरम्यान आता टीव्हीके हा सत्ताधारी पक्ष असणार आहे, तर दुसरीकडे डीएमके हा विरोधी पक्ष असणार आहे. टीव्हीकेने या निवडणुकीत डीएमकेला मोठा धक्का दिला आहे.

Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?