AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीव्हीवर साकारले द्रौपदीचे पात्र, आता बंगालच्या उपमुख्यमंत्री? कोण आहेत रुपा गांगुली?

रुपा गांगुली यांनी आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावर केली. त्यांनी बांगला भाषेतील मुक्तबंध मालिकेतून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी गणदेवता या हिंदी मालिकेत काम केले.

टीव्हीवर साकारले द्रौपदीचे पात्र, आता बंगालच्या उपमुख्यमंत्री? कोण आहेत रुपा गांगुली?
roopa gangulyImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 08, 2026 | 8:20 PM
Share

Who is Roopa Ganguly : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने 293 जागांपैकी तब्बल 207 जागांवर विजय मिळवला. आता तेथे भाजपाचे सरकार स्थापन होणार आहे. दरम्यान, आता तिथे एका नावाची खूपच चर्चा होत आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रुपा गांगुली यांना उपमुख्यमंत्रिपद मिळू शकते असे म्हटले जात आहे. रुपा गांगुली या मूळच्या कोलकाता येथील आहेत. त्यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1966 साली झाला. त्यांचे शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण कोलकाता शहरातच झाले. शिक्षण झाल्यानंतर त्यांनी अभिनयात आपले करिअर करण्याचे ठरवले. त्यांनी बीएचे शिक्षण घेतलेले आहे.

रुपा गांगुली यांची सिनेसृष्टीतील कारकीर्द

रुपा गांगुली यांनी आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावर केली. त्यांनी बांगला भाषेतील मुक्तबंध मालिकेतून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी गणदेवता या हिंदी मालिकेत काम केले. त्यांनी काही चित्रपटांतही काम केलेले आहे. निरुपमा हा त्यांचा पहिला बंगाली चित्रपट आहे. त्यानंतर त्यांनी हिंदी भाषेतील साहेब’ (1985), ‘एक दिन अचानक’ (1989), ‘सौगंध’ (1991) आणि ‘प्यार का देवता’ (1990) यासारख्या चित्रपटांत काम केले. रुपा गांगुली यांना महाभारत या मालिकेमुळे सर्वत्र ओळखले जाऊ लागले.

1992 साली लग्न नंतर घटस्फोट

त्यांनी या मालिकेत द्रौपदीची भूमिका केली होती. लोकांना त्यांची ही भूमिका खूप आवडली. या कामामुळे त्या घराघरात पोहोचल्या. त्यांनी 1992 साली ध्रबो मुखर्जी यांच्याशी लग्न केले. त्यांचे पती मेकॅनिकल इंजिनियर होते. त्यांचे हे नाते फार काळ टिकू शकले नाही. लग्नानंतर 14 वर्षांनी 2006 साली ते वेगवेगळे राहू लागले. त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला.

2015 साली भाजपात दाखल

अभिनय क्षेत्रात करिअर केल्यानंतर 2015 साली त्या राजकारणात आल्या. त्यांनी हावडा नॉर्थ येथऊन पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली होती. यात त्या पराभूत झाल्या होत्या. परंतु त्यानंतर 2016 साली त्यांना भाजपाने थेट राज्यसभेत पाटवले होते. आता त्या लवकरच उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?