Vinod Kambli Health : ब्रेन स्ट्रोकमुळे कांबळींची प्रकृती चिंताजनक, ठाण्यात उपचार होणार, पत्नी-मुलांसह शिंदेंची भेट, भावुक करणारे फोटो

Vinod Kambli Health Update : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मेंदूमध्ये रक्ताची गाठ असल्याने त्यांना ब्रेन स्ट्रोकचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमिवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबाला मोठी मदत केली आहे.

| Updated on: Nov 28, 2026 | 11:02 PM
1 / 6
माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आज शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी कांबळी यांच्या प्रकृतीची आणि सध्याच्या आरोग्यविषयक परिस्थितीची माहिती जाणून घेण्यात आली.

माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आज शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी कांबळी यांच्या प्रकृतीची आणि सध्याच्या आरोग्यविषयक परिस्थितीची माहिती जाणून घेण्यात आली.

2 / 6

विनोद कांबळी यांच्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ झाल्याने त्यांना वारंवार ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढला आहे. याशिवाय स्मरणशक्ती कमी होणे आणि इतर आरोग्यविषयक समस्यांचाही त्यांना सामना करावा लागत आहे.

3 / 6

कांबळी यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार करून त्यांना पूर्णपणे बरे करण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.

4 / 6

विनोद कांबळी यांच्या कुटुंबीयांनाही यावेळी मोठा दिलासा देण्यात आला. त्यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी शिवसेनेच्या वतीने घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

5 / 6

लांच्या शिक्षणात कोणताही खंड पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन कांबळी आणि त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आले. त्यामुळे कांबळी यांच्या उपचारांसोबतच त्यांच्या कुटुंबाच्या भविष्यातील जबाबदारीचीही काळजी घेतली जाणार आहे.

6 / 6

या भेटीवेळी विनोद कांबळी यांची पत्नी अँड्रिया हेविट, मुले जीजस आणि जोहाना कांबळी उपस्थित होते. तसेच एमसीएचे पीच क्युरेटर नदीम मेमन यांचीही यावेळी उपस्थिती होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us