
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा आज त्याचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. विराटने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो वनडे सामन्यांसाठी भारतीय संघात आपले योगदान देत आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा ही त्याची पत्नी आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांनीही आपापल्या क्षेत्रात प्रचंड यश मिळवले आहे, पण शिक्षणाच्या बाबतीत अनुष्का शर्मा विराटपेक्षा बरीच पुढे आहे. विराटने दिल्लीतील विशाल भारती पब्लिक स्कूलमधून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

१९९८ मध्ये त्याने पश्चिम दिल्ली क्रिकेट अकादमीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर क्रिकेटच्या मैदानात त्याने स्वतःचे एक मोठे साम्राज्य उभे केले. तर अनुष्का शर्मा अभ्यासात खूप हुशार होती. ती शाळा आणि कॉलेजमध्ये टॉपर राहिली आहे.

तिने कला शाखेत पदवीधर पदवी मिळवली असून, त्यानंतर तिने अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी देखील पूर्ण केली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने मॉडेलिंग आणि त्यानंतर बॉलिवूडमध्ये यशस्वी करिअर केले.

विराट कोहली त्याची पत्नी अनुष्का शर्मापेक्षा वयाने लहान आहे. अनुष्का शर्माचा जन्म १ मे १९८८ मध्ये झाला आहे. तर विराट कोहलीचा जन्म ५ नोव्हेंबर १९८८ रोजी झाला आहे. अनुष्का शर्मा विराट कोहलीपेक्षा ६ महिन्यांनी मोठी आहे.

अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर या पॉवर कपलने डिसेंबर २०१७ मध्ये लग्न केले. आज त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन अपत्ये आहेत.

आर्थिक बाबतीत, विराट कोहलीने पत्नीला मागे टाकले आहे. विराट कोहलीची एकूण मालमत्ता सुमारे १३०० कोटी रुपये इतकी आहे. त्याची कमाई क्रिकेट, जाहिराती आणि गुंतवणुकीतून जमा होते.

तर अनुष्का शर्माची एकूण मालमत्ता सुमारे २५५ कोटी रुपये आहे. तिचे उत्पन्न चित्रपट, जाहिराती, स्वतःचे प्रोडक्शन हाऊस क्लीन स्लेट फिल्म्स आणि फॅशन ब्रँडमधून येते.