
केरळच्या अवलियाला ( एम.के. हमरास ) महाराष्ट्रातील किल्ल्यांची भुरळ सायकलवर प्रवास करत आतापर्यंत 165 किल्ल्यांना दिली भेट ; श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा असाही जबरा फॅन चर्चेत आला आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम व अलौकिक कार्यातून प्रेरणा संकलित करण्यासाठी केरळ राज्यातील छोट्याशा गावातून सायकलवर निघालेल्या एम.के हमरास याने आतापर्यंत 165 किल्ल्यांना भेटी दिल्या.

370 किल्ल्यांना तो भेटी देणार असून या ध्येयवेड्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या जबरी फॅनने आमच्या चर्चा केली आहे.

एम. के.हमरास चे मराठा फोर्ट्स व दुर्गभ्रमंती व दुर्गजागर यांच्यावतीने करमाळा येथे स्वागत केले.

हमरासचे शिक्षण बी. कॉम पर्यतचे शिक्षण घेतले असून तो सौदी अरेबिया व दुबई येथे वाहनचालकाचे काम केल्यानंतर पुन्हा भारतात आल्यानंतर वयाच्या 23 वर्षापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी कसलीच माहिती नव्हती.

सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे व्हिडीओ पाहून भारावून गेला. महाराजांच्या युद्धनीती,हिंदवी स्वराज्यासाठी दिलेल्या लढा आदींचा अभ्यास चिंतन करीत त्याने सायकलवरून कमी खर्चात 370 किल्ल्यांच्या मोहीम सफरीला सुरुवात केली.