
भारतात भरपूर सूर्यप्रकाश आहे. अनेक जण सकाळच्या उन्हात फिरायला जातात. तरीही अनेकांना ड जीवनसत्वाची कमतरता भासते. या कमतरतेमुळे थकवा जाणवतो. हाडं ठिसूळ होतात. रोगप्रतिकार शक्ती कमी होते.

पण सूर्यप्रकाशात रोज फिरल्याने ड जीवनसत्वाची कमतरता, उणीव भासणार नाही असे नाही. ड जीवनसत्व मिळवण्याचे ते एक माध्यम आहे. सध्या अनेकांची डी जीवनसत्व कमी झाल्याची तक्रार समोर येते. त्यामागे इतरही काही कारणं आहेत.

किती ही खा शरीराला लागत नाही असं आपण म्हणतो. तेच डी जीवनसत्त्वाबाबत आहे. अनेकदा डी जीवनसत्व शरीरात शोषलंच जात नाही. त्यामुळे उन्हात फिरल्यावरही पंचनतंत्राच्या गडबडीमुळे डी जीवनसत्व शरिरात शोषले जात नाही. म्हणजेच काय तर शरीराला लागत नाही. त्यामुळे थकवा जाणवतो.

तर दुसरा प्रकार म्हणजे चरबी वाढल्याने सुद्धा अनेक जीवनसत्व रक्तात विरघळत नाहीत. रक्तात पोहचत नाहीत आणि ती शरिराला ताकद देत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे लठ्ठपणा हा आपल्या देशाचा नवीन शत्रू आहे. तसा तो व्हिटामिन डीचा पण शत्रू आहे.

आजकाल कोणते ना कोणते आजार सुरुच असतात. त्यासाठी औषधं आणि पथ्यपाणी करावं लागतं. गोळ्याऔषधी घ्याव्या लागतात. पण काही औषधांमुळे (anti epileptic drugs) डी जीवनसत्त्वाचे विघटन होते. व्हिटामिन डी ची कमतरता भासते.

जीनमध्ये बदल झाल्याने सुद्धा व्हिटामिन डी योग्यरित्या रक्तात पोहचत नाही. जीनचा हा दोष असतो. म्हणजे तुम्ही कितीही कोवळ्या उन्हात बसला तरी काही लोकांना त्याचा काहीही उपयोग होत नाही. अशावेळी वैद्यकीय तज्ज्ञाचा सल्ला घेणे फायद्याचे ठरू शकते.