
निरोगी शरीरासाठी व्हिटॅमिन डी अत्यंत आवश्यक असते. 'व्हिटॅमिन डी' शरीरात कमी झाले तर अनेक समस्या या निर्माण होऊ शकतात. व्हिटॅमिन डी शरीरातून कमी झाल्यावर आपले शरीर काही संकेत देते.

व्हिटॅमिन डी कमी होण्याचे प्रमुख कारण हे कमी सूर्यप्रकाश आहे. यासोबतच खराब आहार हे देखील एक कारण आहे. व्हिटॅमिन डीची कमतरता त्वचेवर अनेक प्रकारे दिसून येते.

त्वचेच्या पेशींच्या वाढीमध्ये व्हिटॅमिन डी विशेष भूमिका बजावते. त्वचा जास्त कडक होते आणि कमकुवत होते हे व्हिटॅमिन डी च्या कमतरतेने प्रमुख कारण आहे.

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने दुसरे एक मोठे कारण असे दिसून येते की, त्वचा मोठ्या प्रमाणात कोरडी पडते. जर ही लक्षणे दिसत असतील तर आजच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सकाळी कोवळ्या उन्हात बसल्याने व्हिटॅमिन डीची कमतरताना कमी होण्यास मदत होते. हा सर्वात मोठा आणि चांगला उपाय म्हणावा लागेल.