ओमराजे निंबाळकर यांच्यासह ‘या’ नेत्यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. लोकशाहीच्या या उत्सवात अनेक नेत्यांनी देखील मोठा सहभाग दर्शवला आहे. सकाळपासूनच उमेदवार थेट मतदान केंद्रावर सहकुटुंब जाऊन आपला हक्क बजावत आहेत.
1 / 5

धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे
2 / 5

कोल्हापूरच्या गादीचे वारसदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी देखील आज मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे
3 / 5

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे बजावला मतदानाचा हक्क. त्यांच्यासह कन्या अंकिता पाटील ठाकरे, पत्नी भाग्यश्री पाटील आणि मुलगा राजवर्धन पाटील यांनीही केलं मतदान
4 / 5

महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी आज त्यांच्या वरवडे गावात जावून बजावला मतदानाचा हक्क
5 / 5

आमदार भरत शेठ गोगावले आणि माजी जिल्हा परिषद सदस्या सौ सुषमाताई गोगावले यांनी आज खरवली मतदान केंद्रावर जावून सपत्नीक मतदान हक्क बजावला आहे
Follow Us