बोटॉक्स-सर्जरीने बिघडला चेहरा..; ट्रान्सफॉर्मेशनमुळे प्रसिद्ध निर्मात्याची पत्नी ट्रोल

प्रसिद्ध बॉलिवूड निर्माता साजिद नाडियादवालाची पत्नी वर्दा खान नाडियादवाला तिच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आली आहे. वर्दाचा हा नवीन लूक पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलंय. बोटॉक्स, सर्जरीमुळे तिचा लूक पूर्णपणे बिघडल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

| Updated on: Dec 24, 2025 | 11:28 AM
1 / 5
बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माते साजिद नाडियादवालाची पत्नी वर्दा खान नाडियादवालाचा नवीन लूक सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. तिच्या चेहऱ्याचा बदललेला लूक पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काहींनी म्हटलं की ती कार्टूनसारखी दिसतेय, तर काहींनी तिला प्लास्टिक म्हटलंय.

2 / 5
वर्दाचे फोटो सोशल मीडियावर समोर येताच अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. प्लास्टिक सर्जरी किंवा बोटॉक्समुळे वर्दाचा चेहरा पूर्णपणे बिघडल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय. परंतु यावर अद्याप तिने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

3 / 5
वर्दाच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'वय लपवण्यासाठी बोटॉक्स केला असेल, पण आता अजून विचित्र दिसतेय', असं एकाने लिहिलंय. तर 'हा बदल आयेशा टाकियापेक्षा वाईट दिसतोय', असं दुसऱ्याने म्हटलंय.

4 / 5
वर्दाचा पती साजिद नाडियादवाला यांनी बॉलिवूडमधल्या अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. अभिनेता सलमान खान आणि साजिद यांच्या कुटुंबीयांमध्ये बरीच जवळीक असल्याचं पहायला मिळतं. वर्दा खान नाडियादवाला नेहमी तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत असते.

5 / 5
सुंदर दिसण्यासाठी किंवा चेहऱ्यावरील सुरकुत्या, वय लपवण्यासाठी हल्ली सेलिब्रिटी सर्रास बोटॉक्सचा आधार घेतात. माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय यांसारख्या सेलिब्रिटींनीही बोटॉक्स केलंय.