Weekly Horoscope : 3 सर्वात नशीबवान राशी, 5 एप्रिलपर्यंत आयुष्यात…पैशांचा पाऊस पडणार?
हा आठवडा आता तीन राशींसाठी खूपच महत्त्वाचा आणि धनलाभ देणारा ठरणार आहे. त्यामुळे या तीन राशीच्या लोकांचे नशीब फळफळू शकते. जाणून घेऊ या या तीन नशिबवान राशी कोणत्या आहेत.

आता मार्च महिना संपत आला असून सगळ्यांना एप्रिल महिन्याचे वेध लागले आहे. अनेकांनी एप्रिल महिन्यात करावयाच्या कामांची यादी केली आहे. दरम्यान, एप्रिल महिन्यातील सुरुवातीचे पाच दिवस काही राशींसाठी खूपच चांगले असणार आहेत. येत्या 30 मार्च ते 5 एप्रिलपर्यंत काही राशींच्या नशिबात चांगले योग आहेत.

येत्या 5 एप्रिलपर्यंत वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडणार आहेत. मागे असलेला ताण हळूहळू कमी होणार आहे. महिलांना सासरी काही त्रास असेल, तर त्यातूनही सुटका मिळू शकते. तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. तसेच न्यायालयीन लढ्यात विजय मिळू शकतो.

मिथून राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप लकी ठरू शकतो. मिथून राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर त्यातही यश मिळू शकते. 5 एप्रिलपर्यंत मोठा धनलाभ होऊ शकतो. तसेच कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रमोशन मिळू शकते.

कन्या राशीसाठी हा आठवडा चांगला ठरणार आहे. मित्राकडून खूप मदत होऊ शकते. तसेच घरात नातेवाईकांमुळे भांडण होऊ शकते. क्षुल्लक कारणामुळेही जोडीदारासोबत भांडण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे वाद घालणे टाळा. व्यवसायात गुंतवणूक केली तर फायदा होऊ शकतो.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.