
पालघर येथे वीज पुरवठा खंडीत झाल्याने विरारपासून डहाणूकडे जाणाऱ्या वाहतूकीवर मोठा परिणाम झाला आहे. आधीच विरार ते डहाणूसाठी लोकल गाड्याची संख्या कमी असताना या बिघाडाने डहाणूला जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत.

पालघर - तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत ,पश्चिम रेल्वेच्या विरार डहाणू रेल्वे मार्गावरील लोकल सेवे सह लांब पल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या.

विरार स्थानकावरून डहाणूच्या दिशेने दुपारी 3.45 वाजताची लोकल विरार स्थानकावरून काही अंतरावर गेल्यानंतर विद्युत पुरवठा बंद झाल्याने थांबली. तासाभरापासून लोकल विरार आणि वैतरणा दरम्यान एकाच ठिकाणी उभी असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे.

विद्युत पुरवठा बंद होण्याचे कारण अद्याप समोर आले नाही. या तांत्रिक बिघाडामुळे लोकल सह लांबपल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावरही मोठा परिणाम झाला आहे.

रविवारची सुट्टी असल्याने आणि दिवाळीचा सण तोंडावर आल्याने खरेदीसाठी आणि इतर कारणासाठी मुंबईला आलेल्या मुंबईकरांचे आपल्या घरी परताना मोठे हाल होत आहेत.