
दागिने प्रत्येकालाच आवडतात. त्यातही हे दागिने चमकत्या हिऱ्याचे असतील तर थाट वेगळाच असतो. आजघडीला जगात कोट्यवधी रुपये किंमत असलेले हिरे आहेत. पण हिऱ्यांचे वेगवेगळे प्रकार असतात. हे प्रकार कोणते ते जाणून घेऊ या...

हिऱ्यांना प्रामुख्याने दोन प्रकारांत विभागले जाते. पहिल्या प्रकारातील हिरा हा नैसर्गिक असतो. या हिऱ्याला खोदकाम करून बाहेर काढले जाते. हे हिरो शोधण्यासाठी भूगर्भात खोदकाम करावे लागते. त्यानंतर चमकदार आणि मौल्यवान असे हिरे मिळतात. जगात अनेक ठिकाणी अशा हिऱ्यांच्या खाणी आहेत.

हिऱ्यांचा दुसरा प्रकार हा लॅब ग्रोन हिरा असा आहे. हे हिरे कृत्रिम असतात. ते तयार केले जातात. पण हे हिरे नैसर्गिक आणि भूगर्भातून काढलेल्या हिऱ्याप्रमाणेच दिसतात. आजघडीला लॅबमध्ये तयार करण्यात आलेल्या हिऱ्यांनादेखील खूप मागणी आहे.

कृत्रिम हिरे हे एचपीएचटी आणि सीव्हीडी तंत्रज्ञान वापरून तयार केले जातात. अशा हिऱ्यामधील अशुद्धी तंत्र वापरून कमी केली जाते. त्यानंत असे हिरे एकदम पारदर्शी आणि स्वच्छ दिसतात. या हिऱ्यांची किंमत नैसर्गिक हिऱ्यांच्या तुलनेत कमी असते.

हिऱ्याचे इतरही चार प्रकार आहेत. हिऱ्यामधील नायट्रोजन आणि बोरॉन या घटकांच्या आधारावर हे चार प्रकार पडलेले आहेत. या वेगवेगळ्या चार प्रकारांची वेगवेगळी किंमत असते. Type I, Type II, Type la आणि Type lb, Type llb, Type lla, असे काही हिऱ्याचे प्रकार आहेत.