भारतीयांनी 2025 मध्ये Google वर सर्वाधिक वेळा सर्च केला हा 5201314 सात आंकी नंबर, कारण ऐकूण बसेल धक्का
गुगलकडून दरवर्ष ‘Year in Search’ जारी केलं जातं, यामध्ये वर्षभर लोकांनी सर्वाधिकवेळा गुगलवर काय सर्च केलं, कोणते शब्द सर्च केले, कोणता ट्रेंड सर्च केला याची माहिती दिली जाते. यावर्षी लोकांनी सर्वाधिकवेळा एका सात अंकी नंबरचा शोध घेतला आहे.

आजचं युग हे इंटरनेटचं युग आहे. इंटरनेटच्या जगामध्ये दररोज नव-नवीन शब्द आणि ट्रेंड समोर येत असतात. ज्यातील काही ट्रेंड हे खूप खास आणि आश्चर्यकारक असतात. 2025 मध्ये Google वर ज्या शब्दांच्या अर्थाचा सर्वाधिकवेळा शोध घेण्यात आला, त्यामध्ये एका सात अंकाच्या नंबरचा देखील समावेश होता. 5201314 हा सात अंकाचा नंबर गुगलवर 2025 मध्ये सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ‘Stampede’ आणि ‘Mayday’ या दोन शब्दांचा अर्थ गुगलवर सर्वाधिकवेळा सर्च करण्यात आला, मात्र या यादीमध्ये या सात अंकांच्या नंबरने देखील स्थान मिळवलं आहे. ज्या लोकांना इंटरनेट आणि रिलेशनशिप ट्रेंड्सबद्दल फारशी माहिती नसते, त्यांना सहाजिकच हा सात अंकी नंबर गुगलवर लोकांनी का सर्च केला? याबाबत उत्सुकता निर्माण झाली असेल, अनेकांना हे काही तरी रहस्य आहे, असं देखील वाटू शकतं. गुगलकडून दरवर्ष ‘Year in Search’ जारी केलं जातं, यामध्ये वर्षभर लोकांनी सर्वाधिकवेळा गुगलवर काय सर्च केलं, कोणते शब्द सर्च केले, कोणता ट्रेंड सर्च केला याची माहिती दिली जाते.
2025 या वर्षात जगभरात युद्धाचं वातावरण होतं, अनेक देशांमध्ये यावर्षी मोठा संघर्ष झाला त्यामुळे वर्षभरात लोकांनी गुगलवर युद्ध, तणाव, सिझफायर, मॉकड्रिल हे शब्द सर्वाधिकवेळा सर्च केले परंतु त्याचबरोबर 5201314 हा सात अंकांचा नंबर देखील सर्वाधिकवेळा सर्च करण्यात आला. हा एक भावनिकतेशी जोडलेला आकडा आहे. याचा नेमका अर्थ काय होतो? हे जाणून घेण्याचा प्रयत्न लोकांनी केला, विशेष म्हणजे या शब्दाचा इतक्या वेळा शोध घेण्यात आला की, तो नतंर एक ग्लोबल ट्रेंड झाला.
या शब्दाचा शोध घेण्याची सुरुवात सर्वातआधी चीनपासून झाली, मात्र नतंर हा ट्रेंड जगभरात पसरला, भारतामध्ये या वर्षी सर्वाधिक शोध ज्या शब्दांचा घेतला गेला त्यामध्ये हा शब्द तिसऱ्या क्रमांकावर होतो. या शब्दाचा अर्थ जाणून तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसले, जर तुम्हाला कोणी हा आकडा पाठवला तर समोरचा व्यक्ती तुम्हाला वचन देतोय की तो फक्त तुमच्यावर प्रेमच नाही करत तर तो संपूर्ण आयुष्यभर तुमच्यासोबतच राहू इच्छित आहे, असा त्याचा अर्थ होतो. या ट्रेंडची सुरुवात सर्वात प्रथम चीनमधून झाली होती.
