
विसरून जाण्याच्या भीतीमुळे अनेकजण सोपा पासवर्ड ठेवतात. कॉम्यूटर, लॅपटॉप, मोबाईल अशा वेगवेगळ्या उपकरणांना सोपा पासवर्ड ठेवणे कधी-कधी धोकादायक ठरू शकते. खाली दिलेले पासवर्ड तर कधीच ठेवू नयेत.

कधीही password123 हा पासवर्ड ठेवू नये. कारण बहुसंख्य लोकांच्या उपकरणांना हाच पासवर्ड असतो.

12345 अशा प्रकारचा सहज लक्षात राहील असा पासवर्ड ठेवू नका. असा पासवर्ड असल्यास तुमचे उपकरण लवकर हॅक होऊ शकते.

11111, 2222 अशा प्रकारचे एकच अंक असणारे पासवर्ड ठेवू नका. कारण हे पासवर्ड लगेच क्रॅक होऊ शकतात.

iloveyou हा पासवर्डदेखील ठेवू नये. कारण बहुसंख्य लोकांच्या उपरणाला हा पासवर्ड असतो. तो हॅक करण्यास सोपा आहे.

तुमचे नाव तर पासवर्ड म्हणून कधीच ठेवू नका. कारण अशा प्रकारचा पासवर्डदेखील हॅकर लगेच हॅक करतात. (टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)