
प्रेमानंद महाराज हे त्यांच्या डायरीत संत, महापुरुषांचे विचार, कथा नोंदवतात. महाराज असे अनेक वर्षांपासून करत आहेत. त्यात त्यांना एक विचार भावला आणि तो त्यांनी पटकन नोंदवला.

प्रेमानंद महाराजांनी डायरीत एक प्रभावशाली वाक्य लिहिले आहे. तुम्ही जसा विचार करता, तसेच होता. तुम्ही स्वतःविषयी जो भाव आणणार तसेच तुम्ही असणार

तुम्हाला जसे व्हायचे आहे, तसा विचार अगोदर करा. तुम्ही सतत तसाच विचार करत राहिला तर तुम्ही तसेच व्हाल यात तिळमात्र शंका नाही, असे महाराज म्हणतात.

जर तुम्ही एखाद्या व्यक्तीचा, गोष्टीचा, ध्येयाचा ध्यास घेतला. तर तुम्ही प्रत्येक गोष्ट प्राप्त करू शकता. तुम्ही जर सतत तेच काम करत राहिले तर तुम्हाला ती गोष्ट प्राप्त होतेच

जर तुम्हाला वाटते की या जन्मात तुम्हाला देवाचे दर्शन होईल. तर ध्यास करा. तुम्हाला देव निश्चित भेटेल.

जर तुम्हाला वाटतं की देव भेटणं कठीण आहे तर आप की इच्छा ही मेरी ख्वाईश, ब्रह्मांडाची इच्छा असूनही तुम्ही देवाला भेटू शकणार नाही. कारण तुमच्या मनातच तो भाव नाही.