
दूध पिणे हे तुमच्या शरीरासाठी चांगले मानले जाते. यात प्रथिने, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी यासारख्या पोषक घटक तुम्हाला मिळतात. सध्या आपल्याकडे गाय, म्हशीचे आणि शेळीचे दूध सहज उपलब्ध असते.

यापैकी कोणते दूध अधिक फायदेशीर आहे, याबद्दल अनेक लोकांना संभ्रम असतो. आज आपण या तिन्ही प्रकारच्या दुधाचे आरोग्यदायी फायदे काय आणि त्यातील फरक हे जाणून घेऊया.

गाईचे दूध हे पचायला सर्वात सोपे असते. कारण त्यात चरबीचे प्रमाण तुलनेने कमी असते. त्यामुळे लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि शारीरिक हालचाली कमी असलेल्या लोकांसाठी हे उत्तम मानले जाते. या दुधात व्हिटॅमिन डी चांगल्या प्रमाणात असल्याने शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यास मदत होते, ज्यामुळे हाडे मजबूत राहतात.

शेळीचे दूध गाईच्या दुधापेक्षा जास्त घट्ट आणि जाड असते. यात कॅल्शियमचे प्रमाण लक्षणीयरीत्या जास्त असते. एका अभ्यासानुसार, १०० मिलीलीटर गाईच्या दुधात १२० मिलीग्राम कॅल्शियम असते.

तर तेवढ्याच प्रमाणात शेळीच्या दुधात १८० मिलीग्राम कॅल्शियम आढळते. त्यामुळे हाडांची कमजोरी असलेल्या व्यक्ती किंवा गर्भवती महिलांसाठी हे दूध विशेष फायदेशीर ठरते. यात प्रथिने आणि चरबी जास्त असल्याने शरीराला अधिक ऊर्जा मिळते.

कोणते दूध प्यायचे हे तुमच्या गरजा, वय आणि शारीरिक हालचालींवर अवलंबून असते. सोपे पचन आणि कमी चरबीसाठी तुम्ही गाईच्या दुधाची निवड करू शकता. पण जर तुम्हाला अधिक ऊर्जा आणि मजबूत हाड हवी असतील तर तुम्ही शेळीच्या दुधाला प्राधान्य देऊ शकता.

एकूणच, दोन्ही प्रकारची दुधे पौष्टिक असली तरी, तुमच्या आरोग्याच्या गरजा लक्षात घेऊन तुम्ही योग्य दुधाची निवड करणे महत्त्वाचे आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)