
तुम्हाला असणाऱ्या पगारावरून तुम्हाला पर्सनल लोन मिळणार की नाही हे ठरते. तुमचा पगार जेवढा जास्त, तेवढीच लो मिळण्याची शक्यताही जास्त असते.

तुमचा पगार कमी असला तर मिळणाऱ्या पर्सनल लोनची किंमतही कमीच असते.

तुम्ही कोणत्या परिसरात राहता यावरूनही लोनसाठी तुम्हाला किमान किती पगार असावा हे ठरते.

अर्जदार जर मेट्रो किंवा टियर-1 शहरात राहात असेल तर पर्सनल लोनसाठी लागणाऱ्या कमीत कमी पगाराची मर्यादा वाढते.

टियर-2 आणि टियर-3 या श्रेणीत ग्रामी भाग येतो. या भागातून तुम्ही पर्सनल लोनसाठी अर्ज करत असाल तर त्यासाठी किमान पागाराची मर्यादा कमी असते.

पर्सनल लोनसाठी तुमचा किमान पगार तसेच कंपनीत तुमचे पद काय? याचाही विचार केला जातो.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)