Navratri 2026 : नवरात्रीतीला तरुणांमध्ये IV ड्रीप थेरेपीची क्रेझ, थेट शरीरात…ग्लो वाढवण्यासाठी काय केलं जातंय?
IV ड्रिप थेरपीमध्ये काही महत्त्वाचे फ्ल्यूड्स आणि काही पोषक घटकं थेट रक्तवाहिन्यांमध्ये टाकले जातात. अनेक ब्युटी क्लिनिक आणि वेलनेस क्लिकीन वेगवेगळ्या प्रकारचे आयव्ही ड्रीप थेरेपी करतात.

नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आता IV ड्रिप थेरपीची चर्चा होत आहे. अहमदाबादमध्ये नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर Gen Z तरुण IV ड्रिप थेरपीचा करून घेताना दिसत आहेत. गरबा आणि दांडिया नाइटसाठी उत्साही राहण्यासोबतच चेहऱ्यावर ग्लो यावा, यासाठी ही थेरेपी घेतली जातेय.
IV ड्रिप थेरपीमध्ये काही महत्त्वाचे फ्ल्यूड्स आणि काही पोषक घटकं थेट रक्तवाहिन्यांमध्ये टाकले जातात. अनेक ब्युटी क्लिनिक आणि वेलनेस क्लिकीन वेगवेगळ्या प्रकारचे आयव्ही ड्रीप थेरेपी करतात. यामध्ये अनेकदा व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन B, झिंक, मॅग्नेशियम आणि ग्लुटाथायोन यांसारखे घटक असलेल्या ड्रिप्स दिल्या जातात.
अशा प्रकारची आयव्ही ड्रीप घेतल्यावर शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. शरीरातील ऊर्जा वाढते. तसेच त्वचेला चमक येते असे दावे केले जातात नवरात्रीत अनेक तास गरबा खेळल्याने आणि रात्री उशिरापर्यंत जागरण केल्याने तरुणांना थकवा जाणवतो हाच थकवा जाणवू नये म्हणूनही अनेकजण आयव्ही ड्रीप थेरेपी घेतात.
IV ड्रिप थेरपीसाठी वापरले जाणारे घटक आणि क्लिनिकनुसार उपचारांचे दर बदलतात. उपलब्ध वृत्तानुसार, एका सेशनसाठी साधारण चार हजार ते दहा हजार रुपयांपर्यंतचा खर्च येऊ शकतात.
परंतु IV ड्रिप ही वैद्यकीय प्रक्रिया असून ती केवळ सौंदर्योपचार समजणे चुकीचे असल्याचे डॉक्टर सांगतात. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आयव्ही ड्रीप सेशन घ्यावे असे सांगितले जाते.