
स्वप्न शास्त्रानुसार, रात्री माणूस झोपताना जी स्वप्न पाहतो, त्याचे वेगवेगळे अर्थ असू शकतात. स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात काही गोष्टी दिसणं शुभ मानल्या जातात, तर काही अशुभ.

स्वप्न शास्त्रानुसार, झोपेत तुम्हाला स्वप्नात पाण्याचा धबधबा दिसला, तर तो शुभ संकेत आहे. स्वप्नात दिसणारा धबधबा स्वच्छ व सफेद आहे, तर वाईट वेळ संपण्याचे ते संकेत आहेत.

स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात धबधबा दिसण्याचा अर्थ असा आहे की, तुमच्या घरात आनंद परतणार आहे. स्वप्नात तुम्हाला गरम पाणी दिसलं किंवा घाणेरडं पाणी दिसलं, तर ते शुभ नाहीय.

तुम्ही स्वप्नात गरम किंवा घाणेरड पाणी पाहिलं तर याचा अर्थ लवकरच तुमच्या आयुष्यात अडचणी येणार आहेत.

स्वप्नात तुम्ही एखाद्या व्यक्तीला पक्ष्यासारख उडताना पाहिलं, तर तो सुद्धा एक चांगला संकेत आहे. स्वप्न शास्त्रानुसार तुमच्या सर्व समस्या लवकरच संपणार आहेत, असा त्याचा अर्थ असू शकतो.