PAN Card : पॅनकार्डवर 10 अंकी पॅन नंबरचा अर्थ काय असतो? समजल्यावर तुम्हालाही वाटेल आश्चर्य!
पॅनकार्ड प्रत्येकासाठीच खूप महत्त्वाचे असते. पॅनकार्ड नसेल तर अनेक आर्थिक कामे करता येत नाहीत. परंतु पॅनकार्डवर असलेल्या पॅन नंबरचा नेमका अर्थ काय असतो? हे अनेकांना माहिती नाही.

भारतात कोणतीही आर्थिक देवानघेवाण ही प्राप्तिकर कायद्याअंतर्गत वैध असायला हवी. एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नाची तसेच कोणत्याही व्यवहराची माहिती ही तुम्हाला त्या व्यक्तीच्या पॅनकार्डच्या मदतीने मिळते.

पॅनकार्ड वर एक अल्फान्युमरिक कोड असतो. म्हणजेच या कोडमध्ये काही काही अंक तर काही अक्षरं असतात. कर भरणे, बँक खाते खोलणे, गुंतवणूक करणे अशा अनेक आर्थिक व्यवहारांसाठी पॅनकार्डची गरज असते.

परंतु या पॅनकार्डवर जे दहा आकडे असतात, त्याचा नेमका अर्थ काय असतो? याबाबत अनेकजण अनभिज्ञ आहेत. पॅन म्हणजेच पर्मनंट अकाऊंट नंबर असा त्याचा फुल फॉर्म होतो. प्राप्तिकर विभागाकडून हे पॅन कार्ड जारी केले जाते.

पॅन नंबरमध्ये पहिले तीन अक्षरं हे इंग्रजी वर्णमालेचे असतात. त्यानंतर इतर कोणतेही अक्षरं असतात. चौथे अक्षर हे पॅनकार्ड कोणत्या श्रेणीतील आहे, याची माहिती देते. तुमच्या पॅनकार्डमध्ये जर P हे इंग्रजी अक्षर असेल तर हे पॅनकार्ड एका व्यक्तीचे आणि वैयक्तिक आहे असा त्याचा अर्थ होतो.

पॅन नंबरमधील पाचवे अक्षर हे पॅनकार्ड धारकाच्या आडनावातील पहिले अक्षर असते. त्यानंतर चार अकं असतात. शेवटी एक अक्षर किंवा अंक असतो. त्यामुळेच हा नंबर इतर व्यक्तीपेक्षा वेगळा असतो. पॅनकार्ड हे दोन प्रकारचे असतात. एक पॅनकार्ड हे पर्सनल असते तर दुसरे पॅनकार्ड हे कंपनीचे असते.