
सध्या गुगलच्या Gemini AI फोटोंची सगळीगडेच चर्चा होत आहे. इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया साईटवर जिथे तिथे हेच फोटो दिसत आहेत. त्यामुळे हे फोटो कसे तयार करायचे? फोटो तयार करतानाद दिला जाणारा Prompt म्हणजे नेमकं काय असं विचारलं जात आहे.

जेमिनीकडून एआय फोटो तयार करताना नेमके काय इनपुट्स द्यावे लागतात. आणि जे इनपुट्स दिले जातात त्याला नेमकं काय म्हटलं जातं हे अनेकांना माहिती नाही. कोणत्याही एआय टुलला दिल्या जाणाऱ्या इनपुट्सला Prompt म्हटले जाते.

याच Prompt च्या आधारा एआय टुल तुम्हाला दिलेल्या कमांडच्या आधारे उत्तर देते. याच प्रॉम्प्टच्या आधारे सध्या व्हायरल होत असलेले Gemini Retro Photo तयार केले जातात. अशा प्रकारचे फोटो तयार करताना किंवा एआयकडून कोणतेही काम करून घेताना जनरेटिव्ह आर्टिफिशियल इन्टेलिजन्सच्या (GenAI) आधारे लार्ज लँगवेज मॉडेलला (LLM) हे प्रॉम्प्ट पाठवले जातात.

हे प्रॉम्ट काही प्रश्न, कमांड्स, एखादे वाक्य, कोड असू शकतात. काही एलएलएम फक्त आवाज किंवा एखाद्या प्रतिमेचाही सविस्तर अभ्यास करून तुम्हाला हवी असलेली माहिती देऊ शकतात.

तुम्ही कशा पद्धतीने प्रॉम्प्ट दिलेले आहेत यानुसारच तुम्हाला एआयकडून उत्तर मिळतात. तुम्ही चुकीचे प्रॉम्प्ट दिले तर तुम्हाला एआयकडून चुकीची माहिती मिळते. त्यामुळे प्रॉम्प्ट कसे द्यायचे असतात हे समजून घेणे गरजेचे आहे.