
अनेकजण आवडीने मद्यप्राशन करतात. काही लोकांना तर मद्यपानाची सवयच लागून जाते. मद्य जेवढे जुने तेवढे ते प्यायला चांगले, असे मानले जाते. परंतु एकदा मद्याचे झाकन उघडले की ते किती दिवसांच्या आता प्यायला हवे, असे नेहमीच विचारले जाते.

तसं पाहायचं झालं तर काही मद्यं फार जुनी असतात. ती तयार करताना खूपच काळजी घेतली जाते. त्यामुळेच अशी मद्ये लवकर कराब होत नाहीत. चांगल्या पद्धतीने तयार करण्यात आलेल्या मद्यांची सेल्फ लाईफ खूप असते.

परंतु काही मद्यांचे झाकण एकदा उघडले की ते लगेच खराब व्हायला लागतात. त्यामुळेच अशी मद्ये झाकण उघडलण्यानंतर ती लगेच पिऊन घ्यायला हवीत. व्हिस्की, रम यासारखी डिस्टिल्ड मद्ये लवकर खराब होत नाहीत.

त्यामुळे त्यांचे झाकण उघडल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवून आपण ते नंतरही पिऊ शकतो. परंतु नंतर थोड्या दिवसांनी अशी मद्येदेखील खराब होतात. काही मद्यांची लाईफ ही झाकण उघडल्यानंतर 6 महिने ते 1 वर्षांपर्यंत असते. परंतु एकदा झाकण उघडल्यानंतर मद्य खूप दिवस टेवून देणे चुकीचे आहे.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्त्रोतांवर आधारलेली आहे. कोणताही प्रयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. मद्यपान आरोग्यास हानिकारक आहे. मद्यापान करू नये.)