आजकाल ऑनलाईन पेंमेंटची सुविधा आली असली तर सगळीकडे काही ऑनलाइन व्यवहार होत नाहीत. आजही अनेक ठिकाणी, बरेच लोकं हे रोख पैसे देऊन व्यवहार करतात. रोजच्या आयुष्यात 10, 20, 50, 100 आणि 500 च्या नोटांचा बराच वापर होतो. पण आपण या सर्व नोटा वापरतो, त्याच छापण्यासाठी किती खर्च येतो हे तुम्हाला माहीत आहे का ? नोटा छापण्यासाठी सरकारला किती पैसे खर्चकरावे लागतात, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ? नोटेवर लिहीलेलं नूल्य आणि ती (नोट ) छापण्याचा खरा खर्च हा वेगळा असतो. एक-एक नोट छापण्यासाठी किती खर्च येतो आणि तो का, चला जाणून घेऊया. (Photos : Social Media)

या नोटा छापण्यासाठी, विशेष प्रकारचे कागद आणि शाई ही देखील परदेशातून आयात केली जाते, ज्यामुळे नोटांचा खर्च आणखी वाढतो. आरबीआयच्या अहवालानुसार, 10, 20 आणि 50 रुपयांच्या, या छोट्या रकमेच्या नोटा छापण्याचा खर्च सुमारे 1 ते 2 रुपये येत.

तर 100 रुपयांची नोट छापण्यासाठी खर्च थोडा जास्त येतो, ते सुमारे 2 ते 3 रुपये इतका असतो. आणि 500 रुपयांच्या नोटेबद्दल सांगायचं झालं तर ती नोट छापण्यासाठी सरकार सुमारे 2.5 ते 3 रुपये खर्च करतं.

याचा अर्थ असा की एखाद्या रकमेची नोट छापण्यासाठी सरकारला त्यांच्यावर (नोटेवर) लिहिलेल्या किमतीच्या तुलनेत खूपच कमी पैसे खर्च करावे लागतात. दरम्यान या नोटा बनवण्यासाठी सामान्य कागद वापरला जात नाही, तर त्यात एक विशेष प्रकारचा कापूस आणि सिक्युरिटी फीचर असलेला कागद वापरला जातो.

त्या कागदामध्ये वॉटरमार्क, सिक्युरिटी थ्रेड, मायक्रो लेटरिंग,कलर-शिफ्टिंग इंक अशी अेक फीचर्स असतात, ज्यामुळे खोट्या किंवा बनावट नोटा सहज पकडल्या जाऊ शकतील. यामुळेच नोटा छापण्याचा खर्च वाढतो.

दरवर्षी आरबीआय लाखो नोटा छापते. रिपोर्ट्सनुसार,2022-2023 या वर्षात आरबीआयने केवळ नोटा छापण्यासाठी सुमारे 4900 कोटी रुपये खर्च केले. हा खर्च दरवर्षी नोटांची मागणी आणि जुन्या नोटा परत घेण्यावर देखील अवलंबून असतो.

नाण्यांबद्दल सांगायचं झालं तर ती तयार करण्यासाठी जास्त खर्च लागतो. उदाहरणार्थ, 1 रुपयाचं नाण बनवण्यासाठी सरकारला जवळपास 1.6 रुपये खर्च करावे लागतात.