
ब्लेजर आणि कोट हे दिसायला जवळपास सारखेच असतात. अनेक जणांना हे दोन्ही वेगळे असतात याविषयी माहितीच नसते. त्यामध्ये एक अंतर आहे. काय आहे ते अंतर? कसे ओळखतात ब्लेजर आणि कोट?

जसं जंक्शन, सेंट्रल आणि साधारण स्टेशनमध्ये अंतर असते. हॉटेल, मॉटेल आणि रिसॉर्टमध्ये अंतर असते. तसेच अंतर कोट आणि ब्लेजरमध्ये असते. पण हे सर्व प्रकार एकसारखेच वाटतात. कोट आणि ब्लेजरमध्ये फरक आहे.

ऑनलाईन प्लॅटफॉर्म कोरावर एका युझर्सने याविषयीचा सवाल केला होता. या दोघांमध्ये एक मुलभूत फरक हा आहे की, कोट हा त्या सूटचाच एक भाग असतो. त्यामध्ये पँटचा पण समावेश असतो. तर दुसरीकडे ब्लेजर हे स्वतंत्र खरेदी करावे लागते. ते कोणत्याही पँटवर रंगसंगती पाहून घालावे लागते. ते जीन्सवर पण घालता येते.

ब्लेजर हे कोणत्याही ठिकाणी उपयोगी ठरते. ते तुम्ही कार्यालयात घालून जाऊ शकता. एखाद्या सोहळ्यात ते घालू शकता. बाहेर कुठे जायचे असेल तर त्याचा वापर सहज करता येतो.

तर कोट हे एकाच रंगाच्या पँटसह परिधान करावे लागते. कोट औपचारिक पोशाख मानला जातो. हा पोशाख बहुतेकदा वृत्त निवेदक, कंपनीचे सीईओ, नोकरशहा आणि इतर व्यावसायिक तसेच लग्न किंवा इतर कार्यक्रमांमध्ये वापरतात.

तर उलट ब्लेजर हा रोज वेगवेगळ्या शर्ट-पँटवर वापरता येते. ते कोणत्या कार्यक्रमात अथवा अनपौचारिक ठिकाणी उपयोगी ठरते. कोट प्रमाणे ब्लेजर अधिर रंगबिरंगी नसतात. ते फिकट रंगाचे, छटांचे असतात.