
भारतात क्रिकेटचे कोट्यवधी चाहते आहेत. भारताने जगाला सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, विराट कोहली असे महान खेळाडू दिले आहेत. आज आम्ही तुम्हाला क्रिकेटबाबत एक सोपा प्रश्न विचारणार आहोत.

भारतात एकही गाव नसेल जिथे क्रिकेट खेळले किंवा पाहिले जात नसेल. भारतीय चाहते आपल्या देशाच्या खेळाडूंवर अफाट प्रेम करतात. मात्र या चाहत्यांना एका सोप्या प्रश्नाचे उत्तर माहिती नसेल.

क्रिकेटप्रेमींसाठी प्रश्न आहे की, क्रिकेटच्या बॉलचे वजन किती असते? तुमच्यापैकी जवळपास 95 टक्के लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहिती नसेल, आज आपण याचे उत्तर जाणून घेणार आहोत.

पुरुषांच्या क्रिकेटमध्ये नवीन बॉलचे वजन 155.9 ग्रॅम ते 16 ग्रॅम या दरम्यान असते. महिलांच्या क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॉलचे वजन 140 ग्रॅम ते 151 ग्रॅम दरम्यान असते.

क्रिकेट बॉलची साईज (परिघ) पुरुषांसाठी 22.4 ते 22.9 सेमी असते. महिलांच्या क्रिकेटमध्ये बॉल थोडा छोट्या आकाराचा असतो. दोन्ही प्रकारच्या बॉलवर सिलाईदेखील असते. ज्यामुळे बॉल पकडण्यास मदत होते.