Taj Mahal Facts : सेम टू सेम ताजमहाल निर्माण करायसाठी किती कोटी लागणार, आकडा वाचून थक्कच व्हाल!

ताजमहालच्या अधिकृत संकेतस्थळानुसार या वास्तूची निर्मिती ही 1631-32 मध्ये झाली. पांढऱ्या संगमरवरपासून तयार केलेल्या या वास्तूची निर्मिती 1648 साली पूर्ण झाली. या वास्तूच्या निर्मितीसाठी साधारण 16 ते 17 वर्ष लागले.

| Updated on: Nov 21, 2026 | 4:37 PM
1 / 5
ताजमहाल ही अशी वास्तू आहे, जिला पाहून अनेकजण आश्चर्यचकित होतात. या वास्तूची भव्यता, तिच्या निर्माणासाठी वापरण्यात आलेले संगमरवर याबाबत आजही लाखो लोकांना उत्सुकता आहे. दरम्यान, ही वास्तू तयार करण्यासाठी किती रुपये लागले, तसेच या वास्तूबाबत काही रंजक माहिती जाणून घेऊ या.

2 / 5

ताजमहालच्या अधिकृत संकेतस्थळानुसार या वास्तूची निर्मिती ही 1631-32 मध्ये झाली. पांढऱ्या संगमरवरपासून तयार केलेल्या या वास्तूची निर्मिती 1648 साली पूर्ण झाली. या वास्तूच्या निर्मितीसाठी साधारण 16 ते 17 वर्ष लागले.

3 / 5

ताजमहालच्या निर्मितीसाठी साधारण 20 ते 22 हजार कामगार, कारागीर काम करत होते. यात गवंडी, दगड कापणारा, नक्षीकाम करणारा, चित्रकार यांचाही समावेश होता. आजघडीला ताजमहालची निर्मिती करायची असेल तर किती रुपये लागतील याची निश्चित आकडेवारी नाही.

4 / 5

काही रिपोर्ट्सनुसार आजच्या महागाईचा अंदाज लक्षात घेता ताजमहालमधील मुख्य मकबऱ्याची निर्मिती करायची असेल तर त्यासाटी 5280 कोटी रुपयांचा खर्च लागू शकतो. आणखी एका अंदाजानुसार ताजमहालाच्या पूर्ण परिसराची निर्मिती करायची असेल तर त्यासाठी साधारण 7000 कोटी ते 8000 रुपये मिळू शकतात.

5 / 5

ताजमहाल पाहण्यासाठी दरवर्षी लाखो लोक आग्र्याला जातात. 2024-25 साली तिकीट विक्रीतून 99.77 कोटी रुपयांची कमाई केलेली आहे. 2023-24 साली कमाईचा हा आकडा 98.55 कोटी रुपये आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us