
एचडीएफसी ही बँक कार खरेदीसाठी 9.40 टक्के व्याजदाराने कर्ज देते. तुमच्या सिबिल स्कोअरच्या हिशोबाने या व्याजदरात बदल होऊ शकतो. त्यामुळे याच व्याजदराने तुम्ही कार खरेदी करत असाल तर तुम्हाला किती ईएमआय येईल हे जाणून घेऊ या..

समजा तुम्ही आठ लाखांची कार खरेदी करत असाल आणि ही सर्व रक्कम तुम्हाला कर्जातून उभी करायची असेल तर एचडीएफसीच्या व्याजदराच्या हिशोबानेच तुमचा ईएमआय किती असेल हे समजून घेऊ या.

तुम्ही घेतलेल्या कर्जाची मुदत ही पाच वर्षे आहे असे समजुया. कर्जाच्या परतफेडीच्या मुदतीनुसार तुमच्या ईएमआयमध्ये बदल होऊ शकतो.

तुम्ही कारसाठी आठ लाख रुपये कर्ज व्याज म्हणून घेतले तर 9.40 टक्के व्याजदराच्या हिशोबाने पाच वर्षांसाठी तुमचा ईएमआय हा 16,792 रुपये होईल.

म्हणजेच तुम्ही आठ लाख कर्जाच्या बदल्यात बँकेला पाच वर्षांत एकूण 10,05,745 रुपये द्याल. यातील तुम्ही एकूण 2,05,745 रुपये व्याज म्हून बँकेला द्याल.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)