
रस्त्यावर पडलेले पैसे अनेकजण उचलून घेतात. समोर पडलेले पैसे पाहिले की आपल्यालाही ते उचलून घेण्याचा मोह आवरत नाही. परंतु अशा प्रकारे पैसे उचलणे कधी-कधी अंगलट येऊ शकते. तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

अनेकजण रस्त्यावर पडलेले पैसे किंवा इतर वस्तू उचलून घेतात. रस्त्यावर पडलेले पैसे आहेत त्यामुळे माझ्यावर चोरीचा आळ येणार नाही, असे अनेकांना वाटते. परंतु हेच पैसे तुमच्यासाठी खूप अडचणीचे ठरू शकता. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

दहा रुपयांपेक्षा कमी रुपये असतील तर ते उचलून घेता येतात. कायद्यात त्याला कोणतीही शिक्षा नाही, असा अनेकांचा गैरसमज आहे. परंतू भारतीय कायद्यात तशी कोणतीही तरतूद नाही. तुम्ही पैशांच्या मालकाचा शोध न घेताच ते जवळ ठेवून दिले तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

इंडियन कॉन्ट्रॅक्ट अॅक्ट 1872 मधील कलम 71 नुसार सापडलेली वस्तू सांभाळून ठेवायला हवी. म्हणजेच सापडलेले पैसे किंवा वस्तू तुम्ही तुमच्या मालकीची समजून ठेवून देऊ शकत नाही. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

तुम्ही त्या वस्तूच्या खऱ्या मालकाचा शोध घेणे अपेक्षित आहे. तसे न केल्यास भारतीय न्याय संहितेनुसार तुमच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. तुमच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास तुम्हाला दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)