
जेव्हा तुम्ही दारु पिता तेव्हा लिव्हर त्याला लागलीच विघटन करुन शरीरा बाहेर टाकाऊ पदार्थ म्हणून बाहेर टाकते.या दरम्यान काही विषारी घटक तयार होतात. जे लिव्हरला नुकसान करतात. जर तुम्ही दररोज दारु पित असाल तर हे नुकसान मोठे असते

खूप सारे मद्यप्राशन केल्याने Alcohol-Related Liver Disease (ARLD)हा आजार होतो. तो तीन टप्प्यात वाढतो.फॅटी लिव्हर ( लिव्हरमध्ये चरबी जमणे), अल्कोहॉलिक हेपेटायटीस ( लिव्हरला सूज ) आणि सिरोसिस ( लिव्हर कडक होणे )

पहिली स्टेज फॅटी लिव्हर आहे. यात लिव्हरमध्ये चरबी साचते. हे काही आठवडे जादा दारु पिल्याने देखील होऊ शकते. जर वेळीच दारु सोडली तर लिव्हर पुन्हा पुर्ववत होऊ शकतो.

दुसरी स्टेज अल्कोहॉलिक हेपेटायटिस आहे. यात लिव्हरला सूज येते. यामुळे थकवा, उल्टी,भूक कमी लागणे, पिवळी त्वचा ( जॉन्डीस ) ही लक्षणे दिसतात. जर वेळीच उपचार न केल्यास जीवघातक होऊ शकते.

तिसरी स्टेज सिरोसिस आहे. यात लिव्हर खूपच खराब होतो. त्याच्याजागी कडक स्नायू होतो. या स्टेजला लिव्हर बरा होत नाही. अखेर लिव्हर ट्रान्सप्लांट शेवटचा पर्याय असतो.

जर ही लक्षणे दिसत असतील तर डॉक्टरांना लगेच भेटा, डोळे,त्वचा पिवळी पडणे, पोटात सूज किंवा दुखणे, भूक कमी होणे, हाताचे तळवे लाल होणे, जास्त थकवा या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

लिव्हरला वाचवण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे दारु कमी पिणे. जर आधीपासूनचे लिव्हरचा त्रास आहे तर दारुच न पिणे उत्तम.वेळोवेळी तपासणी करणे. त्यातून आजाराचा शोध लागतो.