Falgun Amavasya 2026 : यावेळी फाल्गुन अमावस्या कधी आहे, पहिले सूर्यग्रहण कधी असेल? वाचा नेमकी तारीख!
या दिवशी म्हणजेच फाल्गुन अमावस्येच्या दिवशी पहिले सूर्यग्रहण असेल. हे सर्यग्रहण वलयाकार असेल. सूर्य यावेळी चमकत्या अंगठीप्रमाणे भासेल. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही.

प्रत्येक महिन्याला अमावस्येची तिथी असते. परंतु फाल्गुन अमावस्येला विशेष महत्त्व असते. या दिवशी स्नान, दान केल्याने पुण्यप्राप्ती होते, असे म्हटले जाते. अनेक लोक या दिवशी उपवासही पकडतात. त्यामुळेच फाल्गुन अमावस्य नेमकी कधी आहे, ते जाणून घेऊ या...

फेब्रुवारी महिन्यात फाल्गुन अमावस्या आहे. येत्या 17 फेब्रुवारी 2026 रोजी ही अमावस्या असेल. अमावस्येच्या तिथीची सुरुवात 16 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5.34 वाजता होईल. तर अमावस्या 17 फेब्रुवारी रोजी 05:30 वाजता संपेल.

या दिवशी म्हणजेच फाल्गुन अमावस्येच्या दिवशी पहिले सूर्यग्रहण असेल. हे सर्यग्रहण वलयाकार असेल. सूर्य यावेळी चमकत्या अंगठीप्रमाणे भासेल. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही.

फाल्गुन अमावस्येला पितृ तर्पण आणि पंडदान करणे चांगले असल्याचे मानले जाते. या दिवशी पवित्र नद्यांत स्नान करणे, दाण करणे, भोजनदान करणे पुण्याचे मानले जाते. या दिवशी पुण्याचे काम केल्याने समृद्धी येते असे मानले जाते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.