जेवणानंतर पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती? 99 टक्के लोकांना कल्पनाच नाही

वेगवान जीवनात अनेकदा आपण अन्न पचनकडे दुर्लक्ष करतो. आयुर्वेदानुसार, जेवणानंतर लगेच पाणी पिणे टाळावे. ते पचनक्रिया मंदावते. ४०-४५ मिनिटांनी पाणी प्यावे. हळूहळू आणि चावून खाणे, तसेच ताजे पदार्थ खाणे महत्त्वाचे आहे. रात्री हलके जेवा आणि तणावापासून दूर राहा

| Updated on: Aug 20, 2025 | 3:45 PM
1 / 8
आजच्या वेगवान युगात अनेकदा लोक निरोगी आहाराकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे पचनाच्या समस्या निर्माण होतात. यानंतर कालांतराने गंभीर आजार उद्भवू शकतात. धावपळीच्या जीवनात स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी लोकांकडे वेळ नसतो.

2 / 8
भूक लागल्यावर काहीतरी खाणे, आपण काय खात आहोत आणि त्याचे फायदे काय आहेत, याकडे अनेक जण फारसे लक्ष देत नाही. काहीही खाल्ल्यानंतर आपण लगेचच पाणी पितो. पण जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्यास काय होते आणि पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

3 / 8
आयुर्वेद आणि इतर नैसर्गिक उपचार पद्धतींमध्ये जेवणानंतर लगेच पाणी पिणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्यास पचनक्रिया मंदावते. जेवण पचवण्यासाठी शरीरातील पाचक रस आणि अग्नी सक्रिय होतात.

4 / 8
लगेच पाणी प्यायल्यास हे पाचक रस पातळ होतात. ज्यामुळे अन्न नीट पचत नाही. यामुळे गॅस, पोट फुगणे आणि अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. जेवणानंतर लगेच पाणी पिण्याऐवजी ४० ते ४५ मिनिटांनी पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

5 / 8
या वेळेत पचनक्रिया सुरळीत होते. तसेच शरीराला आवश्यक पोषणतत्त्वे शोषून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. तुम्हाला तहान लागली असल्यास जेवणाच्या दरम्यान एक-दोन घोट पाणी पिऊ शकता. परंतु, जास्त प्रमाणात पाणी पिणे टाळा.

6 / 8
जेवताना शांत आणि आनंदी वातावरण ठेवा. राग, भीती किंवा ताण यांसारख्या नकारात्मक भावना पचनक्रियेवर वाईट परिणाम करतात. अन्न हळूहळू आणि चावून खाल्ल्याने पचन चांगले होते. यामुळे पाचक एन्झाइम्स सक्रिय होतात. तसेच पोटाच्या समस्या टाळता येतात.

7 / 8
आयुर्वेदानुसार, ताजे आणि हंगामात उपलब्ध असणारे पदार्थ खाण्यावर भर द्या. रात्री हलके जेवा आणि लवकर जेवा, जेणेकरून झोपण्यापूर्वी पचनासाठी पुरेसा वेळ मिळेल. जास्त तेलकट किंवा जड पदार्थ खाऊ नका. यामुळे पचनसंस्थेवर ताण येतो, ज्यामुळे गॅस आणि ऍसिडिटी होऊ शकते. दुपारी भरपेट जेवा आणि रात्री हलके जेवा.

8 / 8
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)