पाऊल ठेवताच पोहचाल वेगळ्याच विश्वात! स्वर्गीय गुहेचे दार उघडताच दिसतं काचेसारखं शहर
Mysterious Crystal Clear Cave in Mexico: जगात एक अशी जागा आहे जी इतकी रहस्यमय आहे की ही खरी आहे की नाही हेच समजणार नाही. तिथे गेल्यावर दुसऱ्या जगात असल्यासारखं वाटतं.

मेक्सिकोच्या चिहुआहुआ प्रदेशात एक अशी गुहा आहे जिच्या भिंती दगडांच्या नसून अवाढव्य, चमकणाऱ्या स्फटिकांच्या बनलेल्या आहेत. एवढंच नाही तर ज्यांपैकी काही स्फटिक तर बहुमजली इमारतींइतके उंच आहेत.
हे ठिकाण एखाद्या दुसऱ्याच जगातील असल्यासारखे वाटते, परंतु या सौंदर्याच्या आड एक धोकादायक रहस्य दडलेले आहे. हे ठिकाण इतके रहस्यमय आणि अद्वितीय का आहे, ते जाणून घेऊयात.
मेक्सिकोच्या चिहुआहुआ प्रदेशातील 'सिएरा डी नायका' पर्वताजवळ ही जागा जमिनीखाली सुमारे ३०० मीटर खोलवर वसली आहे. या ठिकाणाला 'जायंट क्रिस्टल केव्ह' असे म्हटले जाते. ही जगातील सर्वात अद्वितीय नैसर्गिक गुहांपैकी एक मानली जाते. येथे जिप्समचे प्रचंड, पांढऱ्या रंगाचे स्फटिक उभे आहेत.
ही गुहा अचानक तयार झालेली नाही. शास्त्रज्ञांच्या मते, सुमारे २ कोटी ६० लाख वर्षांपूर्वी पृथ्वीच्या अंतरंगातून बाहेर पडलेल्या तप्त मॅग्माने 'सिएरा दे नायका' पर्वताची निर्मिती केली.
या पर्वताच्या खाली असलेल्या गरम पाणी आणि खनिजांमुळे तिथे अवाढव्य स्फटिक तयार होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. (रॉयटर्स)