जगातला सर्वात मोठा तुरुंग, एकाच वैळी राहू शकतात 45000 कैदी, सुरक्षा अशी की पळून जाणं अशक्य!
जगात असा एक तरुंग आहे, ज्यामध्ये एका वेळी तब्बल 40 हजार कैदी राहू शकतात. या तुरुंगाची सुरक्षाही चांगलीच चोख आहे. यातून कैदी पळून जाऊ शकत नाही.

जगातील सर्वात मोठी तुरुंग व्यवस्था म्हणून एल साल्वाडोरमधील CECOT जेलची ओळख आहे. टेकोलुका येथे असलेल्या या तुरुंगाचे पूर्ण नाव 'सेंट्रो डी कॉन्फिनामिएंटो डेल टेररिस्मो' असे आहे. कुख्यात टोळ्यांचे सदस्य आणि संघटित गुन्हेगारीशी संबंधित आरोपींना ठेवण्यासाठी 31 जानेवारी 2023 रोजी या जेलची सुरुवात करण्यात आली.
या तुरुंगाची कमाल क्षमता तब्बल 40 हजार कैद्यांची आहे. मात्र, येथे प्रत्यक्ष किती कैदी आहेत, याचे आकडे वेगवेगळ्या अहवालांमध्ये वेगवेगळे आहेत. नोव्हेंबर 2025 च्या एका अहवालानुसार येथे 14561 कैदी होते, तर जानेवारी 2026 मध्ये हा आकडा सुमारे 20 हजार असल्याचे सांगण्यात आले होते.
CECOT मधील कैद्यांसाठी अत्यंत कठोर नियम लागू आहेत. कैद्यांना दिवसातील जवळपास 23 तास 30 मिनिटे कोठडीतच राहावे लागते आणि बाहेर पडण्यासाठी केवळ 30 मिनिटांचा वेळ मिळतो. त्यांना गाद्या किंवा उशा नसलेल्या लोखंडी बहुमजली खाटांवर झोपावे लागते, तर कुटुंबीयांच्या भेटींवरही निर्बंध आहेत.
या तुरुंगात कैद्यांवर 24 तास नजर ठेवली जाते. कृत्रिम प्रकाशव्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षेसाठी विशेष जाळ्यांचा वापर केला जातो. अनेक ठिकाणी खिडक्या, पंखे किंवा एअर कंडिशनर नसल्याने कैद्यांना उष्णता आणि दमट वातावरणाचा सामना करावा लागू शकतो.
सुरक्षेच्या दृष्टीने या तुरुंगाभोवती मजबूत काँक्रीटच्या भिंती, विजेचे कुंपण आणि निगराणी मनोरे उभारण्यात आले आहेत. उपलब्ध अहवालांनुसार येथे 19 वॉचटॉवर असून सैन्य, पोलीस आणि तुरुंग कर्मचारी सुरक्षेची जबाबदारी सांभाळतात.