
या जगात असा एक देश आहे, ज्या देशात महिलांची उंची ही पुरुषांपेक्षा जास्त असते. या देशातील बहुसंख्य महिला या पाच ते सात फूट उंच आहेत. विशेष म्हणजे एखाद्या महिलेची उंची पाच ते सात फूट यापेक्षा कमी असली तर त्या महिलेला तिथे कमी उंचीची महिला समजले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)

प्रत्येक देशात महिलांची सरासरी उंची वेगवेगळी असते. परंतु महिलांची उंची ही फक्त त्या देशातील राहणीमान, आहार यावरही अवलंबून असते. उंचीच्या बाबतीत काही युरोपीय देशातील महिला सर्वाधिक उंच असल्याचे सांगितले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)

विशेषत: बाल्टिक आणि नॉर्डिक क्षेत्रातील देशांमध्ये महिलांची उंची जास्त असते. सरासरी उंचीमध्ये लॅव्हिटा देशाच्या महिला जगात सर्वाधिक उंच असतात असे म्हटले जात. या देशात महिलांची उंची साधारण 170 सेमी म्हणजेच 5 फूट 7 इंच असते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)

ही उंची इतर अनेक देशातील पुरुषांच्या सरासरी उंचीच्या बरोबर आहे.नेदरलँड हा देश महिलांच्या उंचीसाठी अगोदपासूनच प्रसिद्ध आहे. येथे महिलांची सरासरी उंची ही साधारण 170.36 सेमी असल्याचे सांगितले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)

बाल्कन भागातील मोंटेनेग्रो देशेतील महिलांचीही सरासरी उंची खूप जास्त असते. भारतात महिलांची सरासरी उंची ही 152 ते 155 सेमीच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. म्हणजेच युरोपीय देशांच्या तुलनेत भारतातील महिलांची उंची खूप कमी असते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)