
पृथ्वीवरील प्रत्येक देश एखाद्या खास कारणासाठी ओळखला जातो. काही देश मंदिरांसाठी प्रसिद्ध आहेत, तर काही नद्यांसाठी प्रसिद्ध आहेत. आज आपण पर्वतांसाठी प्रसिद्ध असलेल्या देशाची माहिती जाणून घेऊयात.

जगात असे काही देश आहेत ते आपल्या सुंदर पर्वतांसाठी ओळखले जातात. पण तुम्हाला कदाचित हे माहिती नसेल की कोणत्या देशाला पर्वतांचा देश म्हणतात? याचे उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.

भूतान: भारताच्या शेजारील भूतान या देशाला 'पर्वतांचा देश' असे म्हणतात. या देशाचा सुमारे 98.8 % भाग पर्वतांनी व्यापलेला आहे.

नेपाळ आणि किर्गिस्तानलाही पर्वतांचे देश किंवा पर्वतांची भूमी म्हणतात, या देशांमध्येही मोठ्या प्रमाणात डोंगर आहेत. नेपाळमध्ये माऊंट एव्हरेस्ट हे सर्वात उंच शिखरदेखील आहे.

रवांडा या देशाला हजार टेकड्यांचा देश म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर स्वित्झर्लंडचा 60% भाग आल्प्स पर्वतांनी व्यापलेला आहे. या देशांमध्येही मोठ्या प्रमाणात डोंगर आढळतात.