
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतात एकूण भिकाऱ्यांची संख्या 4 लाख 13 हजार 670 होती. हे आकडे 2011 च्या जनगणनेतून घेतले आहेत. यापैकी पुरुष भिकाऱ्यांची संख्या 2 लाख 21 हजार 673 आहे आणि महिला भिकाऱ्यांची संख्या 1 लाख 91 हडार 997 आहे.

भिकाऱ्यांबद्दल सांगायचं झालं तर, पश्चिम बंगाल अव्वल स्थानावर आहे. येथे 81 हजार 244 भिकारी आहेत, जे देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. पश्चिम बंगालनंतर उत्तर प्रदेश आहे, जिथे 65 हजार 853 भिकारी आहेत. त्यानंतर आंध्र प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि राजस्थानचा क्रमांक लागतो.

भारतातील भिकाऱ्यांचे मासिक उत्पन्न हे ठिकाण, गर्दी किंवा शहरावर अवलंबून असते. कोणत्याही अधिकृत सर्वेक्षणात भिकाऱ्यांच्या उत्पन्नाची अचूक माहिती उपलब्ध नाही परंतु असा अंदाज आहे की एक सामान्य भिकारी दररोज 100- 500 रुपये कमावतो.

दिल्ली, मुंबई, कोलकाता किंवा लखनऊ सारख्या मोठ्या शहरांमध्ये, एक भिकारी दररोज 500 - हजार रुपये, म्हणजेच महिन्याला 15 - 30 हजार रुपये कमवू शकतो. देशात असे अनेक भिकारी आहेत, ज्यांचे मासिक उत्पन्न तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतातील सर्वात श्रीमंत भिकाऱ्यांच्या यादीत पहिले नाव मुंबईतील भरत जैन यांचे आहे. भारतातील सर्वात श्रीमंत भिकारी मानले जाणारे भरत जैन वयाच्या 16 व्या वर्षापासून भीक मागत आहेत आणि दरमहा 30 हजा रुपयांपर्यंत कमावतात.

बिहारमधील पटना येथे राहणारी सरवतीया देवी दरमहा 50 हजार रुपयांपर्यंत कमावते आणि दरवर्षी 36 हजार रुपयांचा विमा प्रीमियम भरते.

मुंबईतील कृष्ण कुमार गीत दररोज 1,500 रुपये कमवतात, ज्यामुळे त्यांना 45 हजार पये मासिक उत्पन्न मिळते. संभाजी काळे मुंबईतील एका झोपडपट्टीत राहतात आणि भिक्षा मागून दररोज रुपये 1,500 कमवतात.