जगातील सर्वात जुना राष्ट्रध्वज कोणता? तब्बल 800 वर्षांचा इतिहास, खास काय?

८०० वर्षांहून अधिक काळ वापरात असलेला हा ध्वज केवळ एक निशाण नसून, तो डॅनिश राष्ट्राचा इतिहास आणि स्वाभिमान आहे. लिंडानिसच्या लढाईतील चमत्कारिक लोककथा, धैर्य व शांतीचे प्रतीक असलेले त्याचे लाल आणि पांढरे रंग, आणि नॉर्डिक देशांच्या ध्वजांवर त्याचा प्रभाव आहे.

| Updated on: Oct 08, 2025 | 2:50 PM
1 / 8
प्रत्येक देशासाठी त्याचा ध्वज म्हणजे फक्त एक निशाण नव्हे, तर तो त्या राष्ट्राचा इतिहास आणि स्वाभिमान असतो. पण तुम्हाला माहितीये का? की जगात असा एक ध्वज आहे, ज्याने सर्वात जुना राष्ट्रीय ध्वज म्हणून इतिहास रचला आहे.

2 / 8
डेन्मार्कचा डॅनेब्रॉगला सर्वात जुना राष्ट्रीय ध्वज म्हणून जागतिक विक्रम रचला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने याला अधिकृत मान्यता दिली आहे. हा ध्वज ८०० वर्षांहून अधिक काळापासून, म्हणजेच १३ व्या शतकापासून सतत वापरात आहे. या गौरवशाली इतिहासाने 'डॅनेब्रॉग'ला जगात एक विशेष स्थान मिळवून दिले आहे.

3 / 8
'डॅनेब्रॉग'च्या इतिहासामागे एक थक्क करणारी लोककथा जोडलेली आहे. ती म्हणजे १५ जून १२१९ रोजी एस्टोनियातील लिंडानिसच्या लढाईत डॅनिश सैन्य जेव्हा पराभवाच्या छायेत होते. तेव्हा हा ध्वज आकाशातून चमत्कारिकरित्या खाली पडला.

4 / 8
या घटनेने सैन्यामध्ये एक नवीन उत्साह आणि स्फूर्ती संचारली. या प्रेरणेमुळे डॅनिश सैन्याने युद्ध जिंकले अशी कथा सांगितली जाते. ऐतिहासिक नोंदीनुसार, या ध्वजाचा वापर १३ व्या शतकापासून राष्ट्रीय प्रतीक म्हणून केला जात आहे.

5 / 8
हा ध्वज अतिशय साधा असला तरी त्याचे अर्थ खूप गहन आहेत. यात असलेला लाल रंग हा धैर्य, शौर्य आणि शक्तीचे प्रतीक आहे, जो डॅनिश राष्ट्राच्या पराक्रमाला दर्शवतो. तर मध्यभागी असलेला पांढरा क्रॉस ख्रिस्ती धर्म आणि शांतीचे प्रतिनिधित्व करतो.

6 / 8
या ध्वजाची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॅनेब्रॉगच्या या विशिष्ट डिझाइनमुळेच स्कॅन्डिनेव्हियन क्षेत्रातील इतर देशांचे ध्वजही प्रभावित झाले. स्वीडन, नॉर्वे, फिनलँड आणि आइसलँड यांसारख्या अनेक नॉर्डिक राष्ट्रांनी त्यांच्या ध्वजांवर याच नॉर्डिक क्रॉस शैलीचा अवलंब केला आहे.

7 / 8
आजही डेन्मार्कसाठी 'डॅनेब्रॉग' हा केवळ एक झेंडा नसून, तो त्यांच्या इतिहासाचे, राष्ट्रीय अभिमानाचे आणि ओळखीचे ज्वलंत प्रतीक आहे.

8 / 8
८०० वर्षांहून अधिक काळ टिकून राहिलेला हा डॅनेब्रॉग ध्वज, जागतिक इतिहासातील सर्वात गौरवशाली आणि प्रेरणादायक राष्ट्रीय चिन्हांपैकी एक आहे.