Fog Driving Tips: दाट धुक्यात गाडीच्या कोणत्या लाईट्स वापरायच्या? जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स!
हिवाळ्यात खूप धुकं पडतं अशावेळी दाट धुक्यामुळे कमी समोरचं कमी दिसतं. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. अशावेळी योग्य लाईट्सचा वापर करणे फार गरजेचे आहे.

हिवाळ्यात राज्यातील अनेक ठिकाणी सकाळी आणि रात्री खूप दाट धुकं असतं. अशावेळी समोरचं अनेकदा काहीच दिसत नाही. त्यामुळे गाडी चालवणेही कठीण जातं. अशावेळी गाडीच्या योग्य लाईट्स वापरल्या नाहीत तर तुम्हाला पुढचं काहीचं दिसणार नाही आणि अपघात होईल.
अशा वातावरणात केवळ वाहनाचा वेग कमी करणे पुरेसे नसते, तर योग्य लाईट्स वापरणे महत्त्वाचे असते. यासोबत ड्रायव्हिंगचे काही महत्त्वाचे नियम पाळणेही तितकेच आवश्यक असते. अशा परिस्थितीत, अनेक लोकांच्या मनात प्रश्न पडतो की, दाट धुक्यातून गाडी चालवताना कोणत्या लाईट्सचा वापर करणे सर्वात उपयोगी ठरते.
लो बीम हेडलाइटचा वापर करा. दाट धुक्यात गाडी चालवताना नेहमी Low Beam हेडलाइटचा वापर करावा. यामुळे रस्त्यावरील समोरच्या गोष्टी दिसायला मदत होते.
हाय बीमचा वापर टाळायला हवा. धुक्यात High Beam चा प्रकाश पाण्याच्या सूक्ष्म थेंबांवर पडून परत डोळ्यांकडे येतो. त्यामुळे समोरील रस्ता अधिक अस्पष्ट दिसू शकतो.
फ्रंट फॉग लॅम्प सुरू करा. दाट धुक्यात कारमध्ये फ्रंट फॉग लॅम्प असल्यास ते सुरू करावेत. हे दिवे कारच्या खालच्या बाजूला असतात आणि रस्त्याचा जवळचा भाग पाहण्यास मदत करतात.
रिअर फॉग लॅम्पचा योग्य वापर करा: कमी दृश्यमानता असताना रिअर फॉग लॅम्प सुरू केल्याने मागील वाहनांना तुमची कार ओळखणे सोपे जाते. धुके कमी झाल्यावर हे दिवे बंद करावेत, जेणेकरून मागील चालकांना त्रास होणार नाही.