
तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आजघडीला युद्धातील नीतीमध्ये मोठे बदल झालेले आहेत. आज प्रत्यक्ष रणांगणात उतरून लढाई करण्यापेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हल्ले करण्यात येत आहेत. आजकाल शत्रू राष्ट्रावर हल्ला करण्यासाठी ड्रोनचा सर्रास उपयोग केला जात आहे. त्यामुळेच आजघडीला कोणता देशाकडे किती आणि किती आधुनिक ड्रोन आहेत, यावरून एखाद्या देशाची शक्ती ठरवली जात आहे.

मुस्लीम देशदेखील या स्पर्धेत मागे नाहीत. मुस्लीम ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानने भारतावर ड्रोनच्या मदतीनेच हल्ले केले होते. भारतानेही नंतर पाकिस्तानला जशास तसे प्रत्युत्तर दिले होते. दरम्यान, कोणत्या मुस्लीम देशाकडे सर्वाधिक संहारक ड्रोन तंत्रज्ञान आहे, ते जाणून घेऊ या...

मुस्लीम राष्ट्रांमध्ये ड्रोन तंत्रज्ञानात तुर्कीये हा देश सर्वाधिक पुढे आहे. या देशाकडून ड्रोनचा उपयोग नागोर्नो-काराबाख युद्धात तसेच लीबिया आणि युक्रेन-रशिया संघर्षात केलेला आहे. या युद्धात केलेल्या कामगिरीमुळेच तुर्कीए हा देश ड्रोन टेक्नॉलॉजीमध्ये मुस्लीम राष्ट्रांत सर्वाधिक पुढे आहे.

तुर्कीएकडे सर्वाधिक चर्चेत असलेला आणि सर्वात भेदक मारा करणारा Bayraktar TB2 हा ड्रोन आहे. हा ड्रोन सलग 27 तासांपर्यंत उड्डाण करू शकतो. तसेच तो 25000 फूट उंचीवर जाऊनही टार्गेटला लक्ष्य करू शकतो. चार लेझर गाईडेड बॉम्ब किंवा क्षेपणास्त्र घेऊन जाण्यात सक्षम आहे. लाईव्ह टार्गेटिंग आणि रियल टाईम फिडबॅक यामुळेही तुर्कीएचा हा ड्रोन जगभरात चर्चेत असतो.

भारतदेखील ड्रोन तंत्रज्ञानात मागे नाही. सध्या भारताकडे साधारण 600 पेक्षा जास्त ड्रोन आहेत. यामध्ये Heron-1 आणि SpyLite नावाचे आधुनिक ड्रोन आहेत. भारत सध्या स्वदेशी ड्रोन तंत्रज्ञान विकसित करत आहे. भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानने तुर्कीएकडूनच ड्रोन मागवले होते. परंतु भारताने हे ड्रोन हाणून पाडले होते.