
अंड्याला पोषणासाठी एक सुपरफूड मानले जाते. यात प्रोटीन, विटामिन आणि खनिजांचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे शरीराला खूपच फायदा होतो. परंतू एक प्रश्न मनात येतो की अंड्याचा पांढरा भाग महत्वाचा की पिवळा भाग महत्वाचा ?

अंड्याच्या सफेद भागात प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. आणि यात चरबीचे प्रमाण जवळपास नसते. तर अंड्याच्या पिवळ्या बलकात A, D, E, K आणि B12 सह आयर्न, झिंक, फॉस्फरस सारखे महत्वाचे खनिज आढळतात.

साधारणत: एक अंड्यात सुमारे 6 ग्रॅम प्रोटीन असते. ज्याचा अर्धा भाग पांढरा तर अर्धा भागात पिवळे बलक असते. परंतू या बलकात सुमारे 180-200 मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल असते. ज्यापासून अनेक लोक वाचण्याचा प्रयत्न करतात.

जर तुमचे कोलेस्ट्रॉल सामान्य स्तराचे असेल तर दिवसातून एका अंड्याचे बलक खाल्ल्याने आरोग्यास काही समस्या नसते. परंतू तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर अंड्याचा पांढरा भाग तुमच्या डाएटसाठी अधिक उपयुक्त होऊ शकतो.

अशा प्रकारे अंड्याचे सेवन करताता नेहमी लक्षात घ्यावे. तुमच्या आरोग्याची गरज आणि डाएटचे लक्ष्य पाहून कोणता भाग खायचा किंवा नाही हे ठरवावे.