
मध्य प्रदेश: मध्य प्रदेशात सर्वात जास्त वनक्षेत्र आहे. या राज्यात 94,689 चौरस किलोमीटरवर जंगल आहे. प्रमुख वनक्षेत्रांमध्ये कान्हा, बांधवगड, सातपुरा, पानपठा आणि पेंच राष्ट्रीय उद्यानांचा समावेश आहे.

अरुणाचल प्रदेश: अरुणाचल प्रदेशात अंदाजे 83743 चौरस किलोमीटर क्षेत्रावर जंगल आहे. हे राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. अरुणाचल प्रदेशातील जंगलात विविध वनस्पती आणि प्राणी आढळतात.

महाराष्ट्र: महाराष्ट्रात अंदाजे 61,960 चौरस किलोमीटरवर जंगल आहे. अमरावती, संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, पुणे, ठाणे आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक जंगले आहेत.

ओडिशा: ओडिशामधील सुमारे 61,204 चौरस किलोमीटरचे वनक्षेत्र आहे, तसेच छत्तीसगड मधील अंदाजे 59,772 चौरस किलोमीटर क्षेत्रावर जंगल आहे.

कर्नाटक: कर्नाटकमध्ये अंदाजे 43,382 चौरस किलोमीटर क्षेत्रावर जंगल आहे. ज्यामध्ये अनेक व्याघ्र प्रकल्प, 30 वन्यजीव अभयारण्ये, 15 संवर्धन प्रकल्प आणि एक सामुदायिक अभयारण्याचा समावेश आहे.