
छावा सिनेमामुळे मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास पुन्हा एकदा जगाच्या समोर आला. मराठ्यांना संपवण्याचा चंग बांधणारा क्रूरकर्मा औरंगजेब याची याच भूमीत माती झाली.

औरंगजेब याचा जन्म दोहादमध्ये झाला होता. त्याने भावांना ठार मारून मुघल सम्राट पद मिळवले होते. त्याने वडील शाहजहा याला सुद्धा कैदात टाकले होते.

दोहाद हे गाव गुजरात राज्यात आहे. या गावात 3 नोव्हेंबर 1618 रोजी औरंगजेबाचा जन्म झाला होता. त्यानंतर लष्करी जीवनात त्याने विविध पदावर काम केले.

मुघल सम्राट शाहजहा आणि मुमताज यांच्या पोटी त्याचा जन्म झाला. तो शाहजहाचा तिसरा मुलगा होता. त्याला 3 भाऊ आणि 2 बहिणी होत्या. सम्राटपदासाठी त्याने त्याच्या भावांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली होती.

तो सहावा मुघल सम्राट ठरला. मराठ्यांनी त्याला पळो की सळो करून ठेवले. मराठ्यांना संपवण्यासाठी आलेला औरंगजेब हा दक्षिणेतच संपला.

औरंगजेब याचा 1707 मध्ये 88 व्या वर्षी वृद्ध झाल्याने अहमदनगर येथे मृत्यू झाला. तर नंतर त्याच्या गुरूची झैनुद्दीन सिराजी यांची खुलताबाद येथे कबर होती. त्यामुळे त्याची इच्छा म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर आहे.