dhurandhar 2 : धुरंधर 2 मध्ये मेजर इकबालच्या मुलीचा रोल साकारणारी अहिदा सरमाई कोण?

dhurandhar 2 : धुरंधर 2 शिवाय अहिदा पलाश मुच्छलच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या मकतूब चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. त्याशिवाय अहिदाकडे अजूनही काही प्रोजेक्ट्स आहेत.

| Updated on: Mar 30, 2026 | 2:44 PM
1 / 5
धुरंधर चित्रपटात अनेक स्टार कलाकार आहेत. पण अशा चेहऱ्यांना सुद्धा ओळख मिळाली आहे, जे इंडस्ट्रीतून गायब झालेले किंवा ज्यांच्या करिअरची आता सुरुवात होत आहे. यात एक असं नाव आहे, ज्याचा रोल खूप छोटा पण महत्वाचा आहे.

धुरंधर चित्रपटात अनेक स्टार कलाकार आहेत. पण अशा चेहऱ्यांना सुद्धा ओळख मिळाली आहे, जे इंडस्ट्रीतून गायब झालेले किंवा ज्यांच्या करिअरची आता सुरुवात होत आहे. यात एक असं नाव आहे, ज्याचा रोल खूप छोटा पण महत्वाचा आहे.

2 / 5

आम्ही बोलतोय अहिदा सरमाई बद्दल. तिने चित्रपटात अर्जुन रामपाल ज्याने मेजर इकबालचा रोल साकारलाय त्याच्या मुलीची भूमिका केली आहे. काही मिनिटांचा अहिदाचा हा रोल प्रेक्षकांना आवडला आहे.

3 / 5

अहिदा सरमाईला डाऊन सिंड्रोम आहे. चित्रपटात भले तिचा रोल खूप छोटा असेल. पण इतक्या मोठ्या चित्रपटाचं भाग बनणं ही तिच्यासाठी मोठी उपलब्धी आहे. अहिदा धुरंधर 2 आधी सुद्धा लोकांमध्ये चर्चेत होती.

4 / 5

अहिदाने पहिल्यांदा आयोजित झालेल्या मिस-मिस्टर इंडिया विद डाऊन सिंड्रोम पेजैंटमधून ओळख मिळवली. ब्यूटी पैजेंटमध्ये तिने मिस इंडिया डाउन सिंड्रोम फर्स्ट रनरअपचा किताब जिंकला.

5 / 5

त्याशिवाय अहिदा या कॉम्पटिशनमध्ये टॅलेंट राउंड विनर सुद्धा होती. अहिदा हिमाचलची राहणारी आहे. तिला पेंटिंग करायला विशेष आवडतं. चित्रपटात सुद्धा तिला पेंटिंग करताना दाखवलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us