देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय ते सुप्रिया सुळेंचे व्याही, भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी मिळालेले अरुण लखानी कोण?

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही अरुण लखानी यांना विधान परिषदेसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अरुण लखानी हे फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात. ते कोण आहेत, जाणून घ्या.,.

| Updated on: Jun 01, 2026 | 12:39 PM
1 / 5
विधान परिषदेच्या 17 पैकी 11 जागांवरील उमेदवारांची यादी भाजपने रविवारी जाहीर केली. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही अरुण लखानी यांना वर्धा- चंद्रपूर- गडचिरोली मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. उद्योगपती लखानी हे भाजपचे पदाधिकारी आहेत.

विधान परिषदेच्या 17 पैकी 11 जागांवरील उमेदवारांची यादी भाजपने रविवारी जाहीर केली. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही अरुण लखानी यांना वर्धा- चंद्रपूर- गडचिरोली मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. उद्योगपती लखानी हे भाजपचे पदाधिकारी आहेत.

2 / 5

लखानी हे मूळचे विदर्भातील मलकापूर इथले असून बऱ्याच वर्षांपूर्वी त्यांचं कुटुंब व्यवसायानिमित्त नागपुरात स्थायिक झालं होतं. अरुण लखानी यांची 'विश्वराज इन्फ्रा' ही कंपनी असून या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी रस्ते निर्मितीचं काम केलं आहे.

3 / 5

लखानी हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विश्वासू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही ते निकटवर्तीय मानले जातात. याशिवाय ते महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्षसुद्धा राहिले आहेत. अरुण लखानी यांचा मुलगा सारंग लखानी यांच्यासोबत सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवतीचा साखरपुडा झाला आहे.

4 / 5

मतांचं गणित जुळविण्यासाठी भाजपने उद्योगपती अरुण लखानी यांना रिंगणात उतरविल्याची चर्चा आहे. कन्येच्या विवाहसोहळ्याची पत्रिका देण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली तेव्हा लखानीही तिथे उपस्थित होते.

5 / 5

भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी नाव जाहीर केल्यानंतर मला सुप्रिया सुळे यांनी अभिनंदनासाठी मेसेज केल्याचं अरुण लखानी यांनी सांगितलं आहे. राजकारण आणि वैयक्तिक संबंध वेगवेगळे असतात, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us